Rahu Spasht Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar : कुंभ राशीमध्ये राहूचं स्पष्ट गोचर; 3 राशींवर कोसळणार दुःखाचा डोंगर

Rahu Spasht Gochar 2025: राहू ग्रह सध्या कुंभ राशीत आहे. २९ मे रोजी राहूने गोचर केलं आहे. यामुळे त्यांचा प्रभाव वाढणार आहे. याचं कारण म्हणजे ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कोणत्या राशींसाठी राहूची स्थिती आव्हानात्मक असू शकते हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. राहू ग्रहाला क्रूर ग्रहांच्या श्रेणीत स्थान देण्यात आलंय. राहू ज्यावेळी त्याच्या राशीत बदल करतो किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचे चांगले आणि वाईट परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर दिसून येतात.

काल म्हणजेच २९ मे रोजी राहू स्पष्टपणे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता राहूचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येतंय. राहूच्या स्पष्ट गोचरचा अर्थ असा आहे की, आता राहू त्याचे परिणाम पूर्णपणे दाखवू शकणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

वृषभ रास

राहू तुमच्या कर्म घरात स्पष्टपणे भ्रमण करतोय. या गोचरमुळे, करिअरच्या क्षेत्रात थोडीशी निष्काळजीपणा देखील तुमचं नुकसान करू शकते. कामाशी एकनिष्ठ राहावं लागणार आहे. राहू तुमच्या कौटुंबिक जीवनातही तुमची कठोर परीक्षा घेणार आहे. या काळात तुम्ही वादांपासून दूर राहणं योग्य ठरेल.

कर्क रास

राहूचे स्पष्ट गोचर तुमच्या राशीपासून आठव्या घरात असणार आहे. राहूची ही स्थिती तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणू शकते. कामात अडथळे येऊ शकणार आहेत. योजनेचं पालन न करणं तुमच्यासाठी महागात पडू शकणार आहे. नोकरी शोधणाऱ्या आणि नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठीण आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.

सिंह रास

राहू तुमच्या विवाह आणि भागीदारीच्या सातव्या घरात भ्रमण करणार आहे. कुटुंबासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी चांगली नाही. या काळात, तुमच्या जोडीदाराबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या नात्यावरही परिणाम होणार आहे. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT