Lunar Eclipse on Holi 2025 Saam Tv
राशिभविष्य

Grahan Dosh: 6 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या अडचणी वाढणार; 18 वर्षांनंतर राहू-चंद्र बनवणार अशुभ ग्रहण योग

Grahan Dosh In Kumbh: ६ सप्टेंबरपासून एक अत्यंत महत्त्वाचा आणि काही राशींसाठी अशुभ ठरू शकणारा योग तयार होत आहे. तब्बल १८ वर्षांनंतर राहू (Rahu) आणि चंद्र (Moon) यांची युती होऊन ग्रहण योग (Grahan Yog) तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पंचांगानुसार ग्रह ठराविक कालावधीत राशी बदलत असतात. यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. या योगांचा परिणाम थेट माणसाच्या जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. येत्या ६ सप्टेंबरला चंद्रमा कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. जिथे आधीपासूनच राहु ग्रह स्थित आहे. अशा वेळी राहु आणि चंद्रमा युतीत येऊन ग्रहण योग निर्माण होणार आहे.

या योगाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र तीन राशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव अधिक दिसून येऊ शकतो. या राशींतील लोकांनी विशेष सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे कारण धनहानी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्या राशींनी काळजी घ्यावी ते पाहूयात.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा ग्रहण योग थोडा त्रासदायक ठरू शकणार आहे. राहु आणि चंद्र युती तुमच्या गोचर कुंडलीच्या सहाव्या स्थानात होणार आहे. यामुळे गुप्त शत्रू एक्टिव्ह होऊन त्रास देऊ शकतात. या काळात आर्थिक बाबींमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा ग्रहण योग प्रतिकूल परिणाम करणारा ठरू शकणार आहे. कारण राहु-चंद्रमा युती तुमच्या राशीपासून अष्टम भावात होणार आहे. कामाच्या ठिकाणीही काही अडचणी निर्माण होऊ शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर सर्वांची नजर असेल, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग खर्चिक आणि तणावदायक ठरू शकतो. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या बाराव्या भावात होईल. या काळात फिजूल खर्च वाढण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव जाणवू शकतो. नवीन गोष्टी घेताना सावधगिरी बाळगा. कारण नुकसान होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Face Acne : पिंपल्स होतील गायब, चेहऱ्यावर लावा 'हा' फेसमास्क

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT