Venus And Sun Yuti saam tv
राशिभविष्य

Shukra Surya Yuti: शुक्राच्या राशीत बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या प्रत्येक इच्छा होणार पूर्ण

Venus And Sun Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन महत्त्वाचे ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा अनेक शुभ योग तयार होतात. असाच एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ योग म्हणजे 'शुक्रादित्य राजयोग'.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करत इतर ग्रहांसोबत युती करून विविध शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. यांचा परिणाम माणसाच्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही तर जगातील इतर घडामोडींवरही होताना दिसतो.

येत्या सप्टेंबर महिन्यात शुक्र आणि सूर्य हे तुला राशीत एकत्र येऊन शुक्रादित्य राजयोग निर्माण करणार आहेत. हा योग तयार झाल्यावर काही राशींचे नशीब उजळणार आहे. याचं कारण म्हणजे काही राशींच्या व्यक्तींना या काळात अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि मान-सन्मान मिळण्याची संधी मिळणार आहे. हा काळ कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे ते पाहूयात

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग अत्यंत अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीत पहिल्या भावात तयार होणार असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण आणि आत्मविश्वास वाढणार आहे. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत अधिक वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळणार आहे.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी हा राजयोग उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीपासून अकराव्या भावात तयार होणार आहे. एकाच वेळी अनेक स्रोतांतून पैसा येणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळू शकणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग भौतिक सुख-सुविधा आणि मालमत्तेच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. हा योग तुमच्या कुंडलीत चौथ्या भावात होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. व्यापाऱ्यांना नवीन पद्धतीने पैसे कमावण्याचे मार्ग सापडणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

SCROLL FOR NEXT