Panchang today horoscope SAAM TV
राशिभविष्य

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Panchang today horoscope: आजचा दिवस पंचांगानुसार विशेष मानला जातो. ग्रहस्थितीमध्ये बदल होत असून काही राशींवर भाग्याची विशेष कृपा होणार आहे. आजचा दिवस नवीन संधी, आर्थिक लाभ आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 19 डिसेंबरचा दिवस असून मनःशांती आणि जुन्या गोष्टींचा विचार करण्यासाठी महत्त्वाचा मानण्यात येतोय. आजच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत असल्याने तुम्ही थोडं इमोशनल राहू शकता. मात्र योग्य संयम ठेवल्यास निर्णय अधिक ठाम आणि परिणामकारक ठरतील. अध्यात्म, ध्यान त्याचप्रमाणे अपूर्ण कामांचा आढावा घेण्यासाठी हा दिवस उपयुक्त आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशींना नशीबाची साथ मिळणार ते पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथि- अमावस्या

  • नक्षत्र- ज्येष्ठा

  • करण- चतुष्पद

  • पक्ष- कृष्ण पक्ष

  • योग- शूल (03:47:29 PM पर्यंत)

  • दिन- शुक्रवार

सूर्य एवं चंद्र गणना

  • सूर्योदय – 06:59:18 AM

  • सूर्यास्त – 05:29:23 PM

  • चंद्र उदय – 06:22:48 AM

  • चंद्रास्त – 04:42:40 PM

  • चंद्र राशि – वृश्चिक

  • ऋतु – हेमंत

हिंदू मास एवं वर्ष

  • शक संवत् – 1947

  • विक्रम संवत् – 2082

  • माह – अमान्ता – मृगशिरा

  • माह – पूर्णिमान्ता – पौष

अशुभ मुहूर्त

राहुकाल – 10:55:35 AM ते 12:14:21 PM

यमघंट काल – 02:51:52 PM ते 04:10:37 PM

गुलिकाल – 08:18:04 AM ते 09:36:50 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त – 11:53:00 AM ते 12:35:00 PM

आजच्या चार राशींसाठी आजचा दिवश ठरणार लकी

वृश्चिक

चंद्र आज तुमच्या राशीत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य आहे. मानसिक स्पष्टता मिळेल आणि अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.

मीन

आध्यात्मिक आणि मानसिक समाधान देणारा दिवस आहे. ध्यान, प्रार्थना किंवा सर्जनशील कामात मन रमणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

कुटुंबात काही समस्या असतील तर त्यावर तोडगा निघणार आहे. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घेतल्यास पुढे फायदा होणार आहे. स्थैर्य आणि संयम यामुळे आजचा दिवस फलदायी ठरू शकणार आहे.

कर्क

घरगुती कामं, संपत्तीविषयक चर्चा किंवा भविष्यातील नियोजनासाठी दिवस अनुकूल वेळ आहे. आज केलेले प्रयत्न तुम्हाला पुढच्या काळात उपयोगी पडणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

SCROLL FOR NEXT