Budh Uday in Kumbh Rashi saam tv
राशिभविष्य

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

Mercury rise November 27 luck change: ज्योतिषशास्त्रानुसार बुद्धी, वाणी, व्यापार आणि संवाद यांचा कारक मानला जाणारा बुध ग्रह २७ नोव्हेंबर २०२५ रोजी उदय होत आहे. बुध ग्रहाचा उदय ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा युवराज बुध हा मान-सन्मान, बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार, तर्कशक्ती यांचा कारक मानला जातो. व्यापार करण्याची क्षमता वाढवण्यातही बुधाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो.

शास्त्रांनुसार बुध १२ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत अस्त होणार असून १५ दिवसांनंतर म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:१० वाजता तूळ राशीत उदयाला येणार आहे. बुधाच्या या उदयामुळे काही राशींना भाग्याचा विशेष साथ मिळणार आहे.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा उदय अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या कुंडलीत बुध सहाव्या भावात उदित होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आणि दीर्घकाळापासून असलेली पैशांची तंगी दूर होईल.

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीच्या कुंडलीत बुध चौथ्या भावात उदय होणार आहे. चौथ्या भावात शुक्रही असल्यामुळे ही स्थिती अधिक शुभ ठरणार आहे. जमीन-जुमल्याच्या व्यवहारात लाभ होईल. घरातील दीर्घकाळापासून चालू असलेले वाद संपुष्टात येतील. पालक आणि गुरूंचा पूर्ण सहयोग मिळेल.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या कुंडलीत बुध लाभ भावात उदित होणार आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकते. जमीन-जुमल्याशी संबंधित व्यवहारात यश मिळणार आहे. अविवाहितांना विवाह प्रस्ताव मिळू शकणार आहे. जीवनसाथीसोबत आनंदी वेळ घालवता येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही ही वेळ शुभ ठरेल. आरोग्य चांगले राहील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Potato Recipe : नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा ढाबा स्टाइल 'हा' पदार्थ

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT