Numerology 2 Personality  Saam TV
राशिभविष्य

Numerology Number : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात अत्यंत भाग्यवान; कोणत्याही क्षेत्रात मिळवतात यश

Numerology 2 Personality : कोणत्याही महिन्याचा २, ११, २०, २९ या तारखांना जन्म झाला असेल तर आपला भाग्यांक २ आहे. याच्यावर चंद्राचा अंमल आहे. या तारखेला जन्म झाला असेल तर तुम्ही ध्येयवादी आहात.

Anjali Potdar

कोणत्याही महिन्याचा २, ११, २०, २९ या तारखांना जन्म झाला असेल तर आपला भाग्यांक २ आहे. याच्यावर चंद्राचा अंमल आहे. या तारखेला जन्म झाला असेल तर तुम्ही ध्येयवादी आहात. नवे प्रकल्प, कल्पनाशक्ती, स्वभाव स्वप्नाळू असतो. इतरांनी काही गोष्टी तयार केलेले असतात. त्या प्रत्यक्षात तुम्ही उत्तम रीतीने साकारू शकता.

तुमच्या मध्ये स्वतंत्र विचार नाही असा नाही पण इतरांचे विचार आणि कल्पना तुम्ही प्रत्यक्षात आणता तेच तुमचं कर्तुत्व आहे. योग्य तऱ्हेने विचार करता. निसर्गतः चांगलं - वाईट जाणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. कामातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात उतरवता.

व्यवस्थितपणा, टापटीतपणा हे वैशिष्ट्य गुण आपल्यात आहेत. सुस्त आणि उदास पद्धतीची देहबोली असते. शिस्तबद्ध योजना तुम्ही अस्तित्वात आणता. स्वतःच्या रम्य विश्वामध्ये तुम्ही दंग असता. व्यवहारिक दृष्टिकोनात थोडी कमतरता येते.

बऱ्याच वेळा समाजापासून एकटे राहण्यात आणि स्वतःचे स्वप्न रंगवण्यात तुम्हाला आनंद असतो. तुमच्या प्रभावी कल्पनाशक्ती इतकी दुसऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती क्वचितच आढळते. त्यामुळे या गोष्टी नसणाऱ्या लोकांच्या सहवासात रमणे तुम्हाला कठीण होते.

रम्य विषयाशी समरस होणे, निसर्ग सौंदर्य, फुले आकाशाचे विशालत्व याच्याशी एकरूप होणं तुम्हाला आवडतं. काही प्रमाणात भित्रा आणि मावळ स्वभाव आहे. त्यामुळे दबावाला बळी पडता. अतिशय अस्वस्थ आणि चंचल असल्याने सतत बदल करण्याची प्रवृत्ती असते.

दूरचे प्रवास ,समुद्रातील प्रवास याबद्दल विलक्षण ओढा असतो. आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेऊ नये याबद्दल तुम्ही दक्ष राहणे गरजेचे आहे. एक विशेष शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींबद्दल तुम्हाला आपलेपणा वाटतो. तुमच्या भावना तुम्ही सहजासहजी कुठे प्रकट करत नाही.

मानसिक शक्तीच्या जोरावर इच्छेप्रमाणे इतरांना वागायला लावणे तुम्हाला सहज शक्य होते. तुमचा कारक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे मनाच्या सुप्त शक्तींची पुंजी तुमच्याकडे आहे. जीवनामध्ये साध्या सुखांमध्ये मन रुजवायला आवडतं.

एकेकाळी फार वेळ एकाग्र केल्यास निरुत्साह, मानसिक दाडपलेपण येण्याची शक्यता आहे. आयुष्यात यश मिळते, प्रेमात यश मिळते. या माणसांना अधिकार मिळतात. तुम्ही मित्रांशी खूप चांगले वागता. तुमच्या वागण्यामध्ये धीर गंभीरपणा आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं आहे.

मान सन्मान मिळतात. निष्कारण काळजी करत बसता नको त्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या आहेत. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर अनेकविविध व्यवसाय तुमच्या अंकाला उपलब्ध आहेत. उत्तम कल्पना शक्ती त्यामुळे चाली बांधणे, उत्कंठावर्धक कथा लिहिणे, प्रणय कादंबऱ्या लिहिणे, कलेमध्ये नैपुण्य आहे.

कल्पनाशक्ती चांगली आहे त्यामुळे पेंटिंग, कलाकृती यामध्ये यश मिळते. हे लोक उत्तम शिक्षक असू शकतात. भाषांतर करणे संपादन करणे, द्रवपदार्थाच्या व्यवसायात यश मिळते. केमिस्ट आणि प्रयोगशाळेशी निगडित अशा व्यापारात यश मिळेल. सर्जरी आणि दंतरोग तज्ञ यातही यशस्वी होऊ शकता.

रोग आजाराचा विचार केला तर योग्यरीत्या रक्ताभिसरण न झाल्यामुळे आजाराला तुम्ही बळी पडता. अशक्तपणा कमकुवत हृदय असा तक्रारी होण्याची शक्यता असते. मानसिक अस्वस्थ त्यामुळे मधुमेह, दम्याचा विकार आणि झोपेची तक्रार यांनाही तोंड द्यावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT