Numerology Number 1 Person Saam TV
राशिभविष्य

Numerology 1 Personality : अत्यंत गुणवान असतात १ भाग्यांकाचे लोक, जन्मताच घेऊन येतात आनंद, वाचा...

Numerology Number 1 Person : ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा एक १०, १९ किंवा २८ तारखेचा असेल त्यांचा भाग्यांक १ असतो. ते एक या अंकाच्या अधिपत्याखाली येतात. या अंकाचा कारक रवी ग्रह आहे.

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा एक १०, १९ किंवा २८ तारखेचा असेल त्यांचा भाग्यांक १ असतो. ते एक या अंकाच्या अधिपत्याखाली येतात. या अंकाचा कारक रवी ग्रह आहे. त्यामुळे स्वतंत्र विचार, उद्योग, स्फूर्ती, उत्साह, तल्लखबुद्धी, कलेविषयी असणारे प्रेम या गोष्टीं यामध्ये असतात.

रवि हा आत्म्याचा कारक ग्रह आहे. खरोखर आपल्या सोलला महत्त्व देणारे हे लोक जपतात. भाग्यांक १ असेल तर एकांत, स्फूर्तीची देणगी या लोकांना असते. त्यामुळे सकारात्मकता आनंद उत्साह हे गुण हे सहजच जन्मतः घेऊन आलेले असतात.

शिस्तीच्या बाबतीत हे लोक अगदी प्रामाणिक असतात. बुद्धीच्या जोरावर आणि वक्तृत्व कौशल्यामुळे दुसऱ्यावर सहज छाप पडू शकतात. या अंकाची गुणवत्ता म्हणजे आजकालच्या काळातही या लोकांना धार्मिक आणि गुढ विद्येची सुद्धा आवड असते.

प्रत्येक बाबतीमध्ये डोळस दृष्टिकोनाकडून बघण्याचा यांचा कल असतो. दुसऱ्याला मार्गदर्शन करणे, नेतृत्व देणे उपदेश करणे या गोष्टी यांना मनापासून आवडतात. इच्छाशक्ती, विचारांमध्ये स्वतंत्र बाणा काही वेळेला व्यवहारदक्षही असतात आणि ध्येयवादी असतात.

पण याचे दुर्गुणांचा विचार केला तर हट्टी, मतलबी सुद्धा लोक यामध्ये आपल्याला दिसून येतात. नवीन कलाकृती आणि संशोधन यामध्ये यांचा कल असतो. एखादी नवीन गोष्ट करून त्यामध्ये चैतन्य निर्माण करणे सातत्याने काम, तरुणांसारखा उत्साह आणि जीवनामध्ये अनेक अधिकार मिळवणे हे यांचे ध्येय असते.

सूक्ष्म निरीक्षण आणि प्रवास यामधून यांच्या वर्तनामध्ये एक ठामपण आहे. विशेष म्हणजे वर्तमानपत्र, मासिक व प्रकाशन यांच्याशी यांचा जवळचा चांगला संबंध येतो. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जागृत असतात. यांच्या देहबोलीमध्येच एक प्रकारचे सकारात्मकता आणि अटीट्यूड सुध्दा असतो.

आपलं कर्तुत्व आणि त्यावर असणारा विश्वास यामुळे अति कठीण गोष्टी सुद्धा आणि गुढ प्रश्नही हे उत्तम रीतीने सोडवू शकतात. पुढारीपण, धैर्य, नेतृत्व आणि राजकारण या गोष्टींमध्ये रस आणि चांगल्या गोष्टींची निवड योग्य प्रकारे यांना करता येते. स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून दुसऱ्यांबरोबर सहकार्य करतात आणि जीवनामध्ये यश मिळवतात.

साम, दाम, दंड,भेद वापरून आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य करण्यासाठी हे लोक माहीर असतात. "खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी" स्वतःच्या तत्वाशी कोणत्याच बाबतीत तडजोड करत नाही. आपल्याकडे असणारे गोष्टी इतर लोकांना सांगणार आणि विश्वासात घेऊन त्यांच्याकडून कामही करून घेणारे असतात.

यांच्या नोकरी - व्यवसायाचा विचार केला तर, एखादी नोकरी किंवा व्यवसाय यांचा फार काळ टिकत नाही. साधारण तीन-चार वर्षांनी बदल हवा असतो. जाहिरात माध्यम, वृत्तपत्र व्यवसाय, चित्रपट व्यवसाय यामध्ये यश मिळवू शकतात. रसिकता आणि कलात्मक दृष्टी असल्यामुळे इंटिरियर डेकोरेटर होऊ शकतात.

यांचे संभाषण चातुर्य आणि दुसऱ्यांवर छाप पडणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे विक्रेते परराष्ट्रीय वकील म्हणून हे लोक यशस्वी होतात. नेतृत्व क्षमता चांगली आहे त्यामुळे कार्यकारी संचालक होऊ शक्यता. त्याचबरोबर शल्यचिकित्सा, विद्युतज्ञ, जवाहीर इत्यादी व्यवसायात यश मिळते. हे लोक कोणाच्या हाताखाली काम करणारे नसतात तर इतरांकडून सहजगत्या काम करून घेतात.

त्यामुळे एक या भाग्यांकाचे लोक व्यवसायासाठीच जन्माला आलेले असतात. आरोग्य चांगले असते. उत्साह असतो. खेळीमेळीत दिवस घालवणे आपल्याला आवडते. प्रकृती उत्तम असते. मानसिक ताण, विनाकारण काळजी करणे याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो.

शरीराला न झेपतील असे कष्ट बऱ्याच वेळा आपल्याकडून केले जातात. त्यामुळे मनाची दुर्बलता, कमजोरी, घाबरटपणा, हृदयविकार, डोळ्याचे विकार, उष्माघात हे आजार होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

SCROLL FOR NEXT