Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2025: 3 ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या घरात येणार पैसा; 27 वर्षांनंतर शनी करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांनी आपली जागा बदलल्यावर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. कर्मफलदाता शनि (Saturn) लवकरच एक मोठा बदल करणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर शनि गुरुच्या (Jupiter) नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी देवांना आयु प्रदाता, दंडाधिकारी आणि कर्मफल दाता मानलं जातं. शनी ग्रह आयुष्य, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक, तुरुंग अशा अनेक विषयांचा कारक मानला जातो. म्हणजे या क्षेत्रांवर शनी देवांचं अधिपत्य असतं.

ज्यावेळी शनी देवांच्या गतीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम दिसून येतो. सध्या शनी देव उत्तराभाद्रपद नक्षत्रात भ्रमण करत आहेत. मात्र येत्या ३ ऑक्टोबर रोजी ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह असल्याने काही राशींच्या जीवनात चांगले दिवस सुरू होऊ शकतात. करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मिथुन राशि

मिथुन राशीच्या जातकांसाठी शनी देवाचं नक्षत्र बदल अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. शनी देव तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी निगडित स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात कामकाजात प्रगती होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये नवे टप्पे गाठता येतील. या काळात तुमच्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाईल.

कुंभ राशि

कुंभ राशीच्या जातकांसाठी हा नक्षत्र बदल अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. शनी देव तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात भ्रमण करत आहेत. कामकाजात आर्थिक अडचणी येणार नाहीत, उलट सर्वत्र नफा मिळणार आहे. विवाहित व्यक्तींना वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील.

मकर राशि

मकर राशीच्या जातकांसाठीही शनी देवांचा नक्षत्र बदल शुभ फलदायी ठरणार आहे. शनी देव तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे धैर्य, साहस आणि पराक्रम वाढेल. भाऊ-बहिणींकडून साथ मिळेल. या काळात बऱ्याच प्रवासाच्या संधी मिळतील आणि ते प्रवास लाभदायक ठरतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall: शरीरात दिसणारे हे ४ संकेत सांगतात की केसांची गळती जास्त होणारे; वेळीच ओळखून उपाय करा

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या जवळच्या सहकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल, धनंजय मुंडेंचेही कनेक्शन?

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

Indurikar Maharaj Name: इंदुरीकर महाराजांचं खरं नाव काय? कोणालाच माहित नाही

Skin Care: लग्न सोहळ्यात सगळ्यात उठून दिसायचं आहे? मग फॉलो करा 'हे' घरगुती स्किन केयर टिप्स

SCROLL FOR NEXT