सोमवार,२० ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,नरक चतुर्दशी,अभ्यंगस्नान.
तिथी-चतुर्दशी १५|४५
नक्षत्र-हस्त
रास-कन्या
योग-वैधृति
करण-शकुनी
दिनविशेष-आनंदी दिवस
मेष - शुभ ग्रह पाठीशी आहेत आणि म्हणूनच अडचणीतून आपण बाहेर येणार अशी तीव्र भावना आपली असणार आहे. तरुणांना उत्तम नोकरीच्या संधी, ओळखी मधून विवाह होतील.दिवाळी प्रसन्न अशी सकाळ घेऊन येणारी ठरेल.
वृषभ - धन आराधनेसाठी दीपोत्सव हा तुम्हाला चांगला ठरणार आहे. आपल्या जवळच्या लोकांबरोबर, प्रियजनांबरोबर, प्रियकराबरोबर - उत्साहात, मौजमजेत दीपावली जाईल. संतती इच्छुक व्यक्तींना संतती सुवार्ता येतील आणि आनंदी आनंदाची अशी ही "दिन दिन दिवाळी" आहे.
मिथुन- देवाकडे काही मागण्याची वेळच येणार नाही. काय मागू आणि काय करू अशा संमिश्र भावना असतील. वडीलोपार्जित प्रॉपर्टीचे व्यवहार होतील. तरुणांचे नैराश्य जाईल. नोकरीचे प्रश्न सुटतील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.घर, गाडी खरेदीचे मानस असेल तर ते आता पूर्ण होतील.
कर्क - भावनांचा उद्रेक टाळून पुढे जावे लागेल. आपल्या महत्त्वाच्या वस्तू सांभाळणे आज गरजेचे आहे. विद्युत उपकरणांपासून सावध रहा. पण दिवाळी सुंदर जाईल. वास्तूयोग येतील प्रवासांनी आपले मनोगत पूर्ण होणारी असेही दिवाळी आहे.
सिंह - "दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती" असा दिवस आहे. पूर्व संचितामधून लाभ मिळतील. कुटुंबीय सुखद वार्ता देतील. लॉटरी, गुंतवणूक, धनाची आवक जावक यासाठी दिवाळी उत्तम अशी वार्तांकन घेऊन आलेली आहे.
कन्या - ही दीपावली आपल्याला चांगलीच दैवी प्रचिती घेऊन येणारी आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे भर देणे गरजेचे आहे. नोकरीचे मार्ग पक्के होतील. आनंददायी क्षण उपभोगाल.
तूळ - एखादी दिवत्वाची सुंदर अशी प्रचिती आपल्याला येईल. संत समागम घडून येईल. दैवी स्पंदन देणारी ही दिवाळी आहे. अनेक विविध अनुभव संपन्न करून पुढे जाल. सरकारी माध्यम अनुकूल ठरतील.
वृश्चिक - पाहुण्यांचे आगत स्वागत, खरेदी यांना विशेष उठाव देणारी यंदाची दिवाळी आहे. विक्रमी आणि घसघशीत अर्थ द्वार खुले होईल. व्यवसायामध्ये मोठी वसुली होईल. प्रेमीजनांना हर्षोल्लास देणारी ही दिवाळी आहे.
धनु - व्यवसायामध्ये आपले उपक्रम गाजवून जाल. नव्या नव्या संधी मिळतील. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे योग आहे विद्युत उपकरणे जपून हाताळावेत. दीपावली पर्व आपल्यासाठी उत्तम संधी घेऊन येणार आहे.
मकर - आपल्या राशीला अनेक दिवस ताटकळत असलेल्या सुवार्ता कानावर येतील. करमणुकीमधून आनंद मिळवाल. रहदारीच्या ठिकाणी मात्र सावध राहावे. या दीपावलीमध्ये लांब पल्ल्याचे प्रवास नियोजित कराल. मोठ्या पॅकेजचा लाभ होईल.
कुंभ - नव्या नाही गाठीभेटी होतील. आपल्या लोकांशी छानशी भावस्पदने निर्माण होतील. अडचणी असल्या आर्थिक संकट जरी आले तरी त्यातून मार्गक्रमण कराल. नवनवीन अनुभवानी आपल्याजवळ आलेली दीपावली उत्साहात साजरी कराल.
मीन - जीवन सार्थकी लागली आहे अशी भावना येईल. प्रियजनांच्या सहवासामध्ये रम्यता जाणवेल. संसारामधील शुभ घटनांचा कालावधी जणू हा आहे अशी भावना होईल. खरेदीमध्ये रममाण होऊन जाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.