Mesh Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Aries People Nature: मेष म्हणजे मेंढा. आपली देहबोली अगदी सारखीच असते. मोठे डोळे, कोरडे व राठ कुरळे केस, निधड्या छातीचे, डोक्यात राग.

Anjali Potdar

Mesh Rashi People Nature

राशीचक्रातील पहिलीच रास. अग्नि तत्वाची रास. राशी स्वामी मंगळ. एकूणच जिगर घेऊन आलेले हे लोक असतात. पण आपल्या ध्येयाच्या बाबतीत पक्के. भावनिक सुध्दा आहात. परिश्रम करण्याचे ताकत खूप आहे. मेष म्हणजे मेंढा. आपली देहबोली अगदी सारखीच असते.

मोठे डोळे, कोरडे व राठ कुरळे केस, निधड्या छातीचे, डोक्यात राग. कर्तुत्ववान आणि जबाबदारी अंगावर घेतात. जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असते. आपल्या राशीला या सर्व गोष्टी आहेत आणि म्हणूनच मेष राशीमध्ये राजा रवी उच्च होतो.

आपलं भावा विश्व साकारणारी ही रास आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या अडचणी लीलया पार पाडतात. महत्त्वाकांक्षी, छक्के पंजे न करता संकटाकडे संधी म्हणून बघणारे हे लोक आहेत. त्यामुळे खूपदा नैराश्य, अपयश, आर्थिक संकट, कटकटी, हेवे दावे यांच्यासाठी आपल्या राशीला कुठेही वेळ नाही.

निसर्ग कुंडलीप्रमाणे पहिली येणारी ही रास निश्चितच निर्भय, उत्साही, साहसी, उतावळे असतात. आपली नियम आणि भूमिका याच्यावर ठाम असणारे लोकं आहेत. प्रचंड आत्मविश्वास आणि त्याचबरोबर आरोग्य प्रदान करणारी ही आपली रास आहे.

नव्या उमेदीने आणि जोमाने कामाला लागणारे असे लोक आहात. उष्णतेचे आजार, खूप राग अनावर झाल्यामुळे होणारे आजार, ब्लड प्रेशर, अर्धशिशी, डोकेदुखी हे आजार प्रामुख्याने आपल्याला संभवतात. गणपतीची उपासना कायमच आपल्याला फलदायी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mawa Peda Modak Saran : माघी गणेशोत्सवासाठी बनवा मावा अन् पेढ्यांपासून मोदकांचे सारण, लगेच नोट करा रेसिपी

Municipal Elections Voting Live updates : राज ठाकरे कुटुंबासह मतदानासाठी दाखल

Mitali Mayekar Mangalsutra: ट्रेडिशनल ते वेस्टर्न, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल मिताली मयेकरच्या मंगळसूत्राच्या डिझाइन

Municipal Election : भाजपच्या पोलिंग एजंटकडून आचारसंहितेचा भंग, मीरा रोडमध्ये सकाळी नेमकं काय झालं?

Famous Director : प्रसिद्ध दिग्दर्शकाची फसवणूक; 5 लाखांचा गंडा, FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT