Budh Nakshatra Parivartan saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध ग्रह करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Mercury transit Leo sign: बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, व्यापार, संवाद आणि शिक्षणाचा कारक ग्रह आहे. जेव्हा बुध सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो या राशीच्या रचनात्मक आणि नेतृत्व गुणधर्मांशी जोडला जातो, ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना नशिबाची जबरदस्त साथ मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजकुमार बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्क, बौद्धिक क्षमता, शिक्षण, अर्थव्यवस्था इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, बुध ग्रहाच्या स्थानातील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. बुध सध्या कर्क राशीत बसला आहे आणि ३० ऑगस्टपर्यंत या राशीत राहणार आहे.

बुध या राशीत सर्वात जास्त काळ राहिला असून अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात बराच काळ राहणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस, बुध सूर्याच्या राशी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह मानला जातो. बुध सिंह राशीत गेल्याने सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.

बुध ग्रह अस्त स्थितीमध्ये सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध ३० ऑगस्ट २०२५ रोजी कर्क राशी सोडून सिंह राशीत प्रवेश करणार असून यावेळी काही राशींना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश अनुकूल परिणाम देऊ शकणार आहे. या राशीच्या लोकांचं दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. तुम्हाला सुख-समृद्धीसह भौतिक सुख मिळू शकणार आहे. जर नातेसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज असेल तर तो दूर होईल.

कर्क रास

या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले परिणाम दिसणार आहेत. तुम्ही कपडे किंवा दागिने इत्यादी खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरू शकणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होऊन तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशींच्या व्यक्तींना बुध ग्रहाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कुटुंबातील काही वाद असतील तर ते सुटणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे. रखडलेली कामं या काळात मार्गी लागणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT