Budh Nakshatra Parivartan saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Mercury Planet Transit In Sagittarius: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी, व्यापार यांचा कारक मानला जातो तर गुरु ग्रह हा भाग्य धन आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

डिसेंबर महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यावेळी काही ग्रहांचा उदय तर काही ग्रह अस्त होणार आहेत. याच महिन्यात व्यापाराचे दाता बुध ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहे. याचा काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह 29 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. यावेळी तुम्हाला अचानक पैसाही मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

बुध ग्रहाचा गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला प्रॉपर्टीचे आनंद मिळण्याचे योग आहेत. जमीनीशी संबंधित व्यवसाय करतात त्यांना चांगला फायदा होणार आहे. तुमच्या सर्व इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

बुध ग्रहाचा गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी भ्रमण करणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायातून लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होतात.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं गोचर अनुकूल ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीपासून पंचम भावात भ्रमण करणार आहेत. संतानाशी संबंधित एखादी शुभवार्ता मिळू शकणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग तयार होणार आहेत. विद्यार्थी मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live : अकलूज नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे २२ उमेदवार विजयी

Akola Election : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मोठा हादरा; काँग्रेसने 65 वर्षांची सत्ता उलथवली

Daily Wear Silver Jewellery: ऑफिस किंवा कॉलेज वेअरसाठी ट्राय करा 'या' ट्रेंडी यूनिक सिल्व्हर ज्वेलरी

Nagaradhyaksha Winners List : तुमचा नगराध्यक्ष कोण? २८८ विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Dhule : धुळ्यातील शिंदखेडामध्ये भाजपला मोठा धक्का! अजित पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी

SCROLL FOR NEXT