Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: ऑक्टोबर महिन्यात बुधाच्या गोचरमुळे 3 राशींच्या आयुष्यात येणार आनंद; 'या' राशींना गुंतवणूकीतून मिळणार लाभ

Mercury transit October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह (Mercury) बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचे गोचर (Mercury Transit) होणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर उदयाला जातो किंवा गोचर करतो. या बदलाचा थेट परिणाम व्यक्तीच्या आयुष्यावरच नव्हे तर देश-विदेशातील घडामोडींवरही होत असतो. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाची अशीच स्थिती होणार आहे. या काळात बुध ग्रह दोनदा परिवर्तन करणार असून त्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

व्यापार, बुद्धिमत्ता आणि व्यवहार कुशलतेचा कारक मानला जाणारा बुध ग्रह २ ऑक्टोबर रोजी उदयाला जाणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशींच्या नशिबाचा तारा चमकणार आहे. चला पाहूया कोणत्या राशींना हा योग सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं उदित होणं आणि गोचर दोन्हीही अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. कोणतंही कार्य अधिक नेमकेपणाने आणि यशस्वीपणे पार पाडता येणार आहे. सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन आनंदमय होणार आहे. त्याचप्रमाणे जीवनसाथीच्या प्रगतीचेही संकेत आहेत.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी बुध ग्रहाचा गोचर आर्थिक स्थैर्य देणारा ठरणार आहे. बाराव्या भावातील बुध तुमच्यासाठी नवे उत्पन्नाचे मार्ग उघडणार आहे. या महिन्यात तुमची कमाई आधीपेक्षा वाढणार आहे. मोठे उद्दिष्ट साध्य करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय आणि गोचर अत्यंत सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि कौटुंबिक नाती अधिक मजबूत होणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेषतः लाभदायक ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Comet AI ब्राउझरला धक्का! Amazon ने Perplexity ला फीचर थांबवण्याची दिली नोटीस

विरारचा प्रवास वेगात होणार, निवडणुकीआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, मुंबईसह पुण्यासाठी महत्त्वाची घोषणा

Shirur: मुलगा खेळत होता झोका, दबक्या पावलाने बिबट्या आला; हल्ल्यात चिमुकला बचावला; थरकाप उडवणारा VIDEO

Ahilyanagar News : पुण्यानंतर आता आहिल्यानगर तापलं, जैन समाजाच्या जागेवरून संग्राम जगतापांना घेरलं, ट्रस्टीकडून खुलासा, वाचा संपूर्ण प्रकरण

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे बीडच्या पाली गावामध्ये दाखल, शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद

SCROLL FOR NEXT