Guru Budh Yuti saam tv
राशिभविष्य

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनी जवळ येणार बुध-गुरु युती; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार अपार धन, सुखही येणार दारी

Conjunction Of Budh And Guru 2025: येत्या काळात बुध आणि गुरुची युती होणार आहे. तब्बल १२ वर्षांनी हा संयोग होणार आहे. या संयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. त्या राशी कोणत्या ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा इतर ग्रहांशी त्यांची युती होते. त्यामुळे याचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. येत्या काळात अशीत बुध आणि गुरुची युती होणार आहे.

जून महिना हा ग्रहांच्या गोचरसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात बुध आणि गुरुची युती होणार आहे. जवळपास १२ वर्षांनी ही युती होणार आहे. यावेळी काही राशींचं आयुष्य चमकू शकणार आहे. तर काहींना त्यांच्या आयुष्यातील इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

बुध आणि गुरुचा हा संयोग या राशींच्या व्यक्तींसाठी सकारात्मक सिद्ध होणार आहे. यावेळी कुटुंबातील व्यक्तींशी तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. अविवाहित लोकांना यावेळी चांगली स्थळं येणार आहेत. करियरमध्ये तुमची चांगली वृद्धी होणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत.

मीन रास

गुरु आणि बुधाची ही युती तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रॉपर्टीची खरेदी देखील करू शकता. या काळात तुमच्या घऱात पाहुण्यांचं आगमन होणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे.

वृषभ रास

गुरु आणि बुधाचा संयोग या राशीला चांगले परिणाम देणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणीच्या जोरावर तुम्ही इतरांना स्वतःकडे आकर्षित करू शकणार आहात. कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : १७व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू,'या' किल्ल्याच्या तटावरून दिसायचे निसर्गाचे विहंगम दृश्य

Rule Change : फास्टॅग, LPG ते सिगारेटचे दर वाढले, वाचा ५ महत्त्वाचे बदल

Budget 2026 Live Updates: निर्मला सितारामन करणार नवव्यांदा अर्थसंकल्प सादर

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

Rain Alert : महाराष्ट्रावर पावसाचे सावट, हिवाळ्यात उकाडा वाढला, वाचा कसं असेल आजचे हवामान

SCROLL FOR NEXT