Kendra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakedra Yog: बुध-गुरु बनवणार दुर्मिळ राजयोग; 3 राशींच्या व्यक्तींची होणार एका रात्रीच चांदी

Ardhakedra Yog In Kundli: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. लवकरच बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि भाग्याचा कारक ग्रह गुरु यांच्या युतीमुळे एक अत्यंत दुर्मिळ 'राजयोग' तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली स्थिती बदलतो आणि त्याचा परिणाम जगभरातील घडामोडींवर दिसून येतो. सध्या देवगुरु बृहस्पति मिथुन राशीत विराजमान आहेत. या कालावधीत ते विविध ग्रहांशी युती किंवा दृष्टी करत असल्याने काही खास योगांची निर्मिती होत आहे.

आज गुरु आणि बुध एकत्र येऊन अर्धकेंद्र योग तयार करत आहेत. या विशेष योगामुळे काही राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

अर्धकेंद्र योगाची निर्मिती

४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ७ मिनिटांनी गुरु आणि बुध एकमेकांपासून ४५ अंशांवर येणार आहेत. त्यामुळे अर्धकेंद्र योगाची निर्मिती होणार आहे. सध्या बुध हा बुध्दीचा कारक सिंह राशीत सूर्याबरोबर आहे, तर गुरु मिथुन राशीत स्थित आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु-बुध अर्धकेंद्र योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या काळात लग्न भावात गुरु आणि चतुर्थ भावात बुध असल्यामुळे जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल तसंच अनेक काळापासून सुरू असलेले त्रास संपुष्टात येणार आहे.

सिंह राशी

सिंह राशीसाठी हा अर्धकेंद्र योग विशेष शुभ ठरू शकतो. या काळात लोकांना जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास आणि साहस प्रचंड वाढणार आहे. आत्मविश्वास तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये आणि आव्हानात्मक परिस्थितींमध्ये यश मिळवून देणार आहे.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी गुरु-बुध अर्धकेंद्र योग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकणार आहे. या काळात भाग्याची साथ उत्तम मिळणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होणार आहे. आत्मविश्वास व निर्णयक्षमता वाढेल, ज्यामुळे मोठ्या जबाबदाऱ्या सहज पार पाडता येतील. या काळात देश-विदेश प्रवासाचे प्रबळ योग आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे उत्तम फळ मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT