Dhan Rajyog: 30 वर्षांनंतर शनी देव वक्री अवस्थेत बनवणार धन राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धनलाभ

Shani Dev Vakri In Meen 2025 : लवकरच शनी वक्री होणार आहे, म्हणजेच तो उलटा प्रवास सुरू करणार आहे. शनीच्या या वक्री अवस्थेमुळे आणि त्याच्या कुंभ राशीतील स्थितीमुळे एक शक्तिशाली 'धन राजयोग' तयार होत आहे, जो काही राशींसाठी प्रचंड आर्थिक लाभ घेऊन येणार आहे.
Shash Mahapurush Rajyog
Shash Mahapurush Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव एका राशीत सुमारे अडीच वर्षांनी राहतात. अडीच वर्षांनी ते आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी त्यांना एका राशीत येण्यासाठी सुमारे ३० वर्षे लागतात. शनि देव सध्या मीन राशीत भ्रमण करत आहेत आणि जुलैमध्ये ते वक्री होणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, यावेळी शनि देवाच्या वक्रीमुळे धन राजयोगाची निर्मिती होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. हे लोक कोणत्या राशीचे आहेत ते जाणून घेतलं पाहिजे.

Shash Mahapurush Rajyog
Malavya Rajyog: शुक्राच्या स्थिती बदलाने तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार बंपर फायदा

मकर रास

धन राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीपासून तिसऱ्या घरात वक्री असणार आहेत. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा एक उत्तम काळ असणार आहे. या काळात तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता.

मिथुन रास

धन राज योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन संधी मिळू शकते. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. त्यांना नवीन भागीदार मिळू शकतात.

Shash Mahapurush Rajyog
Gaj Kesari Rajyog: गुरु बनवणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग; 'या' राशींचा बँक बॅलन्स प्रचंड वाढणार

वृषभ रास

धन राज योगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या स्थानावर वक्री राहणार आहेत. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांचं काम आणि व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे अशा लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

Shash Mahapurush Rajyog
Brahma Aditya Yog : सूर्य, बुध आणि गुरु ग्रह बनवणार ब्रह्मा आदित्य योग; 3 राशींची होणार चांदीच चांदी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com