Budh Yam Gochar saam tv
राशिभविष्य

Budh Yam Gochar: बुध आणि यम मिळवून बनवणार अर्धकेंद्र राजयोग; 'या' राशींना मिळणार अडकलेला पैसा, धनसंपत्ती वाढणार

Budh Yam Gochar 2025: बुध हा एकाग्रता, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र यांचा कारक मानला जातो. बुध सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. ज्यावेळी बुध आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती देखील होते. ज्योतिषशास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध हा एकाग्रता, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र यांचा कारक मानला जातो. बुध सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. ज्यावेळी बुध आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो.

महाशिवरात्रीपूर्वी बुध आणि यम 24 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी एकमेकांपासून 45 अंशावर उपस्थित असणार आहेत. यामुळे अर्ध केंद्र योगाची निर्मिती होणार आहे. या अर्धकेंद्र योगाचा लाभ अनेक राशींना होणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे तर काहींना चांगलाच पैसा मिळणार आहे. जाणून घ्या यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

सिंह रास

या राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ मुहूर्त घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. या दरम्यान आपल्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल.

मेष रास

अर्धकेंद्र योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या अनुषंगाने लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या आयुष्यात बरेच मोठे बदल होऊ शकणार आहेत. करिअरच्या क्षेत्रात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांच्या सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठांची साथ मिळू शकते. तुमच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या दरम्यान तुम्हाला धनलाभही होणार आहे. पैशांची बचत करू शकणार आहात. तुमचे प्रेम आणि वैवाहिक जीवन विलक्षण असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT