
व्हॅलेंटाईन वीक सुरु असून उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. जवळपास प्रत्येकजण प्रेम करतो. काहींना या प्रेमात यश मिळतं तर काहींना फसवणूक होते. आता प्रेमाचे दिवस सुरू आहेत, म्हणून या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला त्या राशीच्या मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या अनेकदा फसवणूक करतात.
ज्योतिषशास्त्रातही अशा राशीच्या मुलींचा उल्लेख करण्यात आला आहे. या राशींच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं थोडे कठीण असतं, असा दावा केला जातो. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमचे प्रेम व्यक्त करणार असाल तर आधी त्या मुलींबद्दल जाणून घ्या.
ज्योतिषी तज्ज्ञांच्या मते, मिथुन राशीच्या मुली प्रेमात सर्वात जास्त फसवणूक करतात. त्या स्वतःच्या फायद्यासाठी मित्र आणि नातेसंबंध बनवतात. या राशीच्या मुली कधीही नातेसंबंधांमध्ये गंभीर नसतात.
कर्क राशीच्या मुली नातेसंबंधांच्या बाबतीत फार चांगल्या नसतात, असं मानलं जातं. या राशीच्या मुली त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी इतरांशी मैत्री करतात. त्यांना कधी आणि कोणती गोष्ट त्रासदायक ठरेल हे सांगता येत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या मुलींवरही सहज विश्वास ठेवता येत नाही. या राशीच्या मुली सुंदर असतात. मात्र त्यांच्या सौंदर्याने तुम्ही फसवू नये कारण या राशीच्या मुली कपटी असतात.
मकर राशीच्या मुली फसवणूक करण्यातही तज्ञ असतात. अशा मुलींसोबत नातं ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा. या राशीच्या मुली स्वभावाने थोड्या हट्टी असतात. काम झाल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीचा विचार करत नाहीत.
मीन राशीच्या मुली सरळ स्वभावाच्या असल्या तरी त्यांच्याशी असलेले संबंध फारसे यशस्वी होत नाहीत. असं म्हटलं जातं की, या राशीच्या मुली सुरुवातीला त्यांच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवतात, परंतु नंतर त्यांना फारसा फरक पडत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.