Shani Jayanti 2026 Saam Tv
राशिभविष्य

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Jayanti: शनी जयंतीपूर्वी शुक्र आणि बुध ग्रहांच्या गोचरामुळे काही राशींना मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक स्थिती, गुंतवणूक आणि नवीन संधींसाठी हा काळ वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी शुभ मानला जात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

१६ मे रोजी शनी जयंती आणि शनिश्चरी अमावस्या साजरी केली जाणार आहे. या सणाच्या ठीक दोन दिवस आधी, शुक्र आणि बुध ग्रहांचे गोचर होणार आहे. पंचांगानुसार, शुक्र १४ मे रोजी स्वराशीत प्रवेश करेल आणि बुध देखील १५ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम शनी जयंतीवरही होणार आहे.

शनी ग्रहासोबतच शुक्र आणि बुध ग्रहदेखील शनी जयंतीच्या दिवशी जन्मलेल्यांवर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करणार आहेत. या ग्रहस्थितीमुळे अनेक राशींसाठी शुभ फळ मिळू शकतात. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ

वृषभ राशीला सर्वाधिक फायदा होणार आहे. तुमच्या राशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे संपत्ती, आकर्षण आणि करिअरच्या प्रगतीला चालना मिळू शकते. नवीन नोकरी, पदोन्नती आणि आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होत आहेत.

मिथुन

हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदे घेऊन येणार आहे. अचानक आर्थिक लाभ, परदेशाशी संबंधित संधी आणि नवीन प्रकल्पांची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कर्क

उत्पन्नात वाढ होण्याची लक्षणं आहेत. नेटवर्किंग आणि मित्रांकडून मिळणारा पाठिंबा फायदेशीर ठरू शकतो. गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह

करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.

कन्या

या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. नवीन सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. शिक्षण आणि प्रवासाच्या क्षेत्रातही फायदे दिसून येऊ शकतात.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: ड्राय केस होतील मऊ आणि शायनी; पार्लरऐवजी घरीच तयार करा 'हा' हेअरपॅक

Home Remedies : घशातील चिकट कफ निघता निघत नाहीये? 'हे' ६ घरगुती उपाय करून पाहा

Health Tips : दुपारच्या जेवणानंतर लगेच झोप का येते? जाणून घ्या यामागची ६ सोपी कारणे

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, आमदार सुनील शेळके आणि RTI कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात तुफान खडाजंगी

Maharashtra News Live Update: अहिलनगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT