राशीचक्रातील बारावी म्हणजे शेवटची रास. पूर्वाभाद्रपदा चौथा चरण, उत्तरा भाद्रपदा चार चरण व रेवती चार चरण अशी नक्षत्रे या राशीमध्ये येतात. दोन मासे विरुद्ध तोंड करून एकमेकांच्याकडे आहेत. असे या राशीचे चिन्ह आहे. माशांचा गुण बघता जवळ गेल्यास दचकतात. तसेच या राशीचे लोक सुद्धा भित्र्या स्वभावाचे असतात. गुरुतत्त्वाची जलरास आहे. तसेच बहुप्रसव राशी आहे.
गुरुची रास असल्याकारणाने विश्वासू, प्रेम, दयाळूपणा, माया, ममता, मध्यस्थी करणे वाटाघाटी करणे या गोष्टी तुम्ही करता. पण तरीसुद्धा आतून खूप वेळा घाबरलेले असता. दुसऱ्याचे दोष काढणे, किंचित गबाळेपणा, अनेक कामे एकावेळी करणे आणि कुठल्याही कामात पूर्ण लक्ष न देणे हे मात्र दोष या राशीमध्ये येतात. अनेक गोष्टी शिकतात, जीव ओतून काम करतात एखाद्या विद्येवर प्रभुत्व मिळवता येत नाही.
उद्योगी, कष्टाळू, सतत बदल करणाऱ्या या व्यक्ती व्यवहारीक उलाढालीपासून मागेच राहतात. प्रकृती स्थूल असते. या राशीची मालकी व्ययस्थानाकडे येते. त्यामुळे खूप खोलवर विचार करणे. कधी कधी अति विचाराने नैराश्य या गोष्टी येतात. परंपरा, सदविचार, सामाजिक स्थान या गोष्टी यांच्याकडे आहेत.
लोक काय म्हणतील असा विचार करत बसणारे हे लोक आहेत. आनंदी वृत्तीमध्ये राहणं, समाधानी राहणं हे ना आवडते. पण मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी कचरतात. पलायनवाद आणि एकांतवास या दोन्हीवरी यांना मात करता येत नाही. ही भावनिक रास आहे. प्रेमाची रास. जलाशय किंवा सरोवराची द्योतक म्हटले आहे.
त्यामुळे या राशीचा अंमल पाणी, वनस्पती, मोती, मासे यांच्यावर येतो. समुद्राची खोली जशी जाणवत नाही. तसा यांचा स्वभाव असतो भावनाप्रधान आणि सात्विकता यांच्याकडे आहे. या राशीचा अंमल पावलावर आहे भक्तिभावाने सद्गुरुची उपासना करणे असे गुण या लोकांच्यामध्ये असतात. इथे शुक्र ग्रह उच्चीचा होतो.
पावले खरंतर शरीराचा सर्व भार संभाळतात आणि विना तक्रार असतात. मीन राशीचे कार्यही असेच आहे. रोजच्या जीवनामध्ये कलहवादाची जेव्हा परिस्थिती येते त्यावेळी ते दोन पावले मागे जातात. ताण व आनंद या दोन्ही गोष्टींचे पारडं एकत्रितरीत्या त्यांना ठेवायला जमते. खरेदीसाठी हिरीरीने पुढे जाणारे आणि यादीच्या पलीकडचे सामान घेऊन येणारे लोक आहेत.
स्वतःचे गुण अवगुण यांना नीटसे कळत नाहीत. त्यामुळे आपलं काय चुकलं या संभ्रमामध्ये हे राहतात. भोळेपणामुळे आपले सर्वस्व देण्याची वृत्ती आहे. या लोकांचा व्यवसायाचा विचार केला तर - दवाखाना, धर्म, अध्यात्म ठिकाणे, रुग्णालय, तुरुंग, कैदखाना, धार्मिक संस्था, भिक्षागृह, दानगृह इत्यादी आहेत.
किरकोळ कामे करणारे जतक यांत येतात. रोग आजाराचा विचार केला तर- चरबी मुळे होणारे आजार, अति खाण्यामुळे होणारे आजार, पावलांशी निगडित आजार, मधुमेह हे आजार होऊ शकतात. कित्येकदा आळशीपणा, खाण्यापिण्याची आवड यामुळे होणाऱ्या आजारही यांच्यामध्ये दिसून येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.