Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: मंगळ ग्रह 'या' 3 राशींना करणार मालामाल; एप्रिल महिन्यापासून तिजोरीत भरणार नुसता पैसा, नोकरीही लागणार

Grah Gochar 2025: एप्रिल महिन्यात मंगळ ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने बदल घडणार आहे. यामध्ये कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. मंगळ ग्रह हा अग्नि तत्वाशी संबंधित आहे. या कारणास्तव त्याला अंगारक, भौम त्याचप्रमाणे पृथ्वीचा पुत्र असंही म्हणतात. सर्व ग्रह एका विशिष्ट वेळी त्यांची हालचाल बदलतात. त्याचप्रमाणे, मंगळ देखील दर ४५ दिवसांनी त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सध्या मंगळ मिथुन राशीत स्थित आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या गुरुवारी ३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे १:५६ वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत मंगळ असून कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या कारणास्तव, मंगळाच्या भ्रमणाचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. यावेळी काही रासींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मेष रास

या राशीचा स्वामी मंगळ असल्याने याचा परिणाम राशीच्या लोकांच्या चौथ्या भावावर होणार आहे. यामुळे कौटुंबिक आनंद वाढणार आहे. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित फायदे देखील मिळू शकतात. नवीन घर खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आईकडून लाभ मिळण्याची पूर्ण आशा आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी, हे गोचर बाराव्या घरावर परिणाम करणार आहे. यामुळे परदेश प्रवासाच्या संधी निर्माण होणार आहे. तुम्हाला आध्यात्मिक लाभ मिळू शकणार आहे. परदेशात स्थायिक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात मंगळाच्या गोचरचा परिणाम खूप सकारात्मक राहणार आहे. या काळात तुम्हाला चांगले प्रकल्प मिळू शकतात. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कोर्टाच्या केसेसमधून तुमची सुटका होणार आहे. घरात एखादं मंगलकार्य होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कैसा हराया? आता संपूर्ण शहर हिरवं करू; निवडणूक जिंकताच MIMच्या महिला नगरसेवकाचं ओपन चॅलेंज, VIDEO

Malanggad Funicular Train: मलंगगड फ्युनिक्युलर सेवा सुरू, 2 तासांचा प्रवास अवघ्या ७ मिनिटांत होणार; भाडे किती असणार?

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात कंत्राटी कामगारांचं आंदोलन चिघळलं

Late Dinner Effect: रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक, तरुणावर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT