Mahabhagya Yoga astrology saam tv
राशिभविष्य

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Mangal Shani Kendra Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार पुढील १८ महिन्यांत मंगळ ग्रह एक विशेष योग निर्माण करणार आहे. या योगामुळे काही राशींवर शनी देवाची कृपा राहणार असून त्यांना जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनी या ग्रहांना विशेष महत्त्व देण्यात येतं. मंगळाला ग्रहांचा सेनापती मानण्यात येतं. मंगळ हा साहस, पराक्रम, ऊर्जा, जमीन, यांचा कारक आहे. तर दुसरीकडे शनी हा कर्म, न्याय, रोग, दुःख आणि स्थिरता यांचा कारक मानला जातो. त्यामुळे या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

डिसेंबर महिन्यात शनी मीन राशीत विराजमान राहतील. तर मंगळ 7 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनू राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत शनी आणि मंगळ यांच्या संयोगाने केंद्र दृष्टि योग तयार होणार आहे. या योगाचा परिणाम तीन राशींवर खास करून दिसून येणार आहे.

मीन राशि

मीन राशीच्या जातकांसाठी मंगळ-शनीचा केंद्र दृष्टि योग अनेक बाबतीत खास ठरू शकतो. या काळात करिअरमध्ये प्रगती होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडू शकणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ लग्नात आणि शनी चौथ्या भावात विराजमान असणार आहेत. या राशीच्या लोकांसाठी केंद्र दृष्टि योग विशेष ठरणार आहे. अध्यात्माकडे अधिक ओढ निर्माण होऊ शकणार आहे. करिअरमध्ये कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या जातकांसाठीही शनी-मंगळाचा केंद्र दृष्टि योग अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या दशम भावात शनी आणि सातव्या भावात धनू विराजमान असणार आहे. यामुळे करिअरमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. पैसा साठवण्यात यश मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य; कार्यकर्त्यांचा हातात पेट्रोलची बाटली अन् आत्मदहनाचा इशारा, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती, स्वतः अजित पवार घेणार मुलाखती

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

Chanakya Niti: फसव्या महिलांना कसे ओळखावे? आचार्य चाणक्यांनी सांगितले 7 महत्त्वाचे मार्ग

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT