Tuesday Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope: भरभरून यश मिळेल, 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवल्याने होईल फायदा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha: ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अनेक राशींसाठी सकारात्मक घडामोडी घेऊन आलेला आहे. तुमच्या राशीत काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आजचा दिवस बदलांनी भरलेला असू शकतो. प्रेमसंबंध जास्त मजबूत होण्याची शक्यता असून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

वृषभ

आज तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल. नवीन आव्हाने स्वीकारण्याची तुमची तयारी तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाल.व्यावसायिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

आर्थिक बाबतीत आज कोणतीही मोठी अडचण जाणवणार नाही. मात्र आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदाराच्या भावना आणि मतांचा आदर करा. आरोग्याची काळजी घेतल्याने दिवस जास्त टेन्शन फ्री जाईल.

कर्क

आजचा दिवस आनंददायी आणि उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या जबाबदाऱ्यांमुळे भविष्यात पदोन्नतीची संधी निर्माण होऊ शकते.

सिंह

व्यावसायिक कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही आव्हाने समोर येतील, मात्र त्यावर मात करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य उत्तम साथ देतील.

कन्या

आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. खर्च करताना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नातेसंबंधातील प्रश्न संयमाने हाताळा. वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

तुळ

जोडीदाराला जास्त वेळ देण्याची गरज आहे. जोडीदारासोबत संवाद वाढवल्यास गैरसमज दूर होतील. यश मिळवण्यासाठी मेहनत गरजेचे राहील. आरोग्यासाठी जंक फूडपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक

आजचा दिवस प्रेमसंबंधांसाठी उत्तम राहील. जोडीदारासोबतचे नाते जास्त घट्ट होऊ शकते. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मानसिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

धनु

आजचा दिवस समृद्धी आणि प्रगतीचा संकेत देणारा आहे. करिअरमध्ये नवीन लक्ष्य निश्चित करण्यासाठी योग्य वेळ आहे. चांगल्या आरोग्यासाठी बाहेरील पदार्थांचे सेवन टाळा.

मकर

आज आर्थिक स्थिती चांगली राहील आणि पैशांशी संबंधित मोठी समस्या उद्भवणार नाही. आरोग्यही उत्तम राहण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांतील वाद वाढू नयेत याची काळजी घ्या. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल.

कुंभ

कामाच्या ठिकाणी काही किरकोळ अडथळे येऊ शकतात. मात्र तुमच्या मेहनतीमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्यही तुमच्या बाजूने राहणार असल्याने आत्मविश्वास वाढेल.

मीन

आजचा दिवस अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि सकारात्मक विचार मनात राहतील. मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. अविवाहित व्यक्तींना प्रेमसंबंधांबाबत आनंदाची बातमी मिळू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Potato Sheera : रताळ्याचा शिरा परफेक्ट बनत नाही? मग आत्ताच फॉलो करा ही स्टेप बाय स्टेप रेसिपी

Cooking Hacks : सकाळचा स्वयंपाक होईल झटपट! 'या' ६ ट्रिक्स गृहिणींचा वाचवतील वेळ

म्यानमार-थायलंड सीमेवर 800 भारतीय ओलीस, नोकरीचं आमिष, 25 मराठी तरुण छळछावणीत

विलास घुले हत्येत बलात्काराचा ट्विस्ट, महिलेचा घुलेच्या मित्रावर ब्लॅकमेलिंगचा आरोप

जळगाव हादरलं! जंगलात नेत 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचार करताना बनवला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT