Ruchika Jadhav
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात फक्त बालपणच फार सुखद आणि आनंदायी असतं.
पालक आपल्या मुलांसोबत कसे वागतात यावर देखील मुलांचं बालपण अवलंबून असतं.
लहान मुलांसमोर पालकांमध्ये सतत वाद आणि भांडणे होताना दिसत असतील तर याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर पडतो.
अनेक पालक विचार पटत नसल्याने वेगळे होतात. मात्र या गोष्टी एवढ्या लहान वयात मुलं पाहतात.
काही पालक आपल्या मुलांसमोरच शिवीगाळ करतात. त्यामुळे मुलांची मानसीकता हळूहळू ढासळते.
कायम हसणारी खेळणारी आणि बागडणारी मुलं त्रस्त होतात आणि टेंन्शनमध्ये जगू लागतात.
लग्न विवाह या सर्वांसाठी मुलांच्या मनात राग अथवा भीती निर्माण होऊलागते.
त्यामुळे मुलांचं अभ्यासातही लक्ष लागत नाही.
मुलांचं बालपण चांदलं जावं यासाठी माता-पिता देखील चांगले असणे गरजेचं आहे.