Magha Nakshatra google
राशिभविष्य

Magha Nakshatra: मघा नक्षत्रातील व्यक्तींची नोकरी, व्यवसाय व आरोग्याची सविस्तर माहिती

Magha Nakshatra Astrology: केतू या ग्रहाचा अंमलाखाली येणारे हे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वभाव अतिशय मानी अपमान सहन करू शकत नाहीत. सन्मानाची अपेक्षा करणारे आणि तशीच कृती करणारे.

Saam Tv

मघा नक्षत्र -

केतू या ग्रहाचा अंमलाखाली येणारे हे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वभाव अतिशय मानी अपमान सहन करू शकत नाहीत. सन्मानाची अपेक्षा करणारे आणि तशीच कृती करणारे. अत्यंत कर्तृत्ववान, शेतीचे भोक्ते, स्वतः शिस्तीने वागणारे, दुसऱ्यांनीही शिस्तीने वागावे असे खडसावून सल्ला देणारे असतात. कष्टाळू, उच्चभिलाषी, महत्त्वाकांक्षी, उच्च ध्येय बाळवणारी आणि त्यांची पूर्तता करण्याची पूर्ण क्षमता असणारे, कठोर बोलणे, ईश्वरावर, पुजारी, धार्मिक श्रद्धा विविध उपाय यांवर विश्वास ठेवणारे सामाजिक कार्य स्वबळावर रे.

प्रत्येक ठिकाणी पुढारी पण घेऊन ते मिरवणारे. निर्भीड, साहसी,खेळांची आवड, उद्योगी, आचार विचार संपन्न, नोकर चाकर यांच्याकडून कामे करून घेणारे, पण संशयी स्वभावाने आयुष्यात निरर्थक वादविवादांना तोंड द्यावे लागते आणि नुकसान व दुःख पदरात येऊ शकते.

नोकरी व्यवसाय -

सरकारी खात्यात काम करणारे वर्ग, कस्टम अधिकारी, पोलीस पाटील, संपर्क अधिकारी, सूचना विभागातले कामगार, खाजगी कंपनीतले अधिकारी, सरकारी व्यवहार पुरे करावे लागतात. शासकीय ठेकेदार, सरकारी रेशन दुकानदार, सुरक्षा गार्ड, शेतकऱ्यांना सरकारी सवलतीचा सल्ला देणे, सरकारला कापूस, धान्य पुरवणारे शेतकरी, सरकारी सन्मान प्राप्त होणारे कलावंत, खेळाडू.

तसेच समाजसेवक, उपकरण विक्रेते, उद्योगपती, केतूमुळे गुढ विद्येत प्राविण्य, ज्योतिषी, पोलीस, हत्यारे तयार करणारे, विद्युत उपकरणे तयार करणे, दुरुस्त करणे, गुप्तहेर खाते, लेखक, गुढकथा लेखक, धाडसी कामाचे वर्णन करणारे लेखक, खणखणीत आवाजामुळे दरारा निर्माण करणारी कामे, सोनार काम करणारे, धर्मपिठावरचे मुख्याधिकारी, श्राद्ध पक्ष, अंत्य विधी, प्रेतांचे विधीत काम करणारे किरवंत या नक्षत्राचे असू शकतात.

रोग आजार -

अंगाचा दाह होणे, डोळ्यांची जळजळ, अंगावर लाल पुरळ, डोके दुखणे, अर्धशिशी, कापणे, शस्त्राने जखमा, ऑपरेशन, अपघात, स्त्रियांना स्त्री विषयक विकार, मूर्च्छा येणे, पाठदुखी, हृदयविकार, विषारी अन्नामुळे बाधा, संशयाने पछाडून मानसिक शारीरिक त्रास, मूत्रपिंडाचे विकार, भूत पिशाच्च बाधा होणे, हाडांचे विकार, हाड मोडणे आणि ऍनिमिया इत्यादी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

SCROLL FOR NEXT