आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

saturday horoscope : काही राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. काहींचे पार्टनरसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
horoscope in Marathi
horoscopeSaam tv
Published On

मेष : आज दिवसभर मन प्रसन्न राहील. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : कार्यालयात वरिष्ठांशी संवाद साधताना काळजी घ्या. खांद्यावर पडलेल्या जबाबादारी व्यवस्थित पार पाडाल. व्यावसायिकांची दिवसाची सुरुवात चांगली जाईल.

मिथुन : रागीट स्वभावामुळे नुकसान होईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आज काहींचं नशीब उजळेल.

horoscope in Marathi
आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

कर्क : तु्म्ही पर्यटनस्थळी फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. चांगली नोकरी मिळवण्यात अपयश येऊ शकते. तुमच्यावर लोकांचा विश्वास वाढेल.

सिंह : व्यवसायात नफा मिळत असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल.

कन्या : करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतो. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. किरकोळ खर्चात अचानक वाढ होऊ शकते.

तूळ : आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. दिवसाची सुरुवात चांगली होईल. कार्यालयात मनासारखे काम होईल.

वृश्चिक : स्वत:सहित कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तेलकट पदार्थ खाणे टाळावे लागेल. मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल.

धनु : मित्रांसोबत फिरायला गेल्यावर फास्टफूड खाणे टाळावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. ध्येय गाठण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील.

horoscope in Marathi
Horoscope: 'या' 5 राशींच्या लोकांचं बदलणार नशीब; मिळेल नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात उन्नती, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

मकर : व्यवसायात पार्टनरशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज संकटाचा सामना करावे लागेल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलासा मिळेल.

कुंभ : व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहील. डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करावे लागेल.

मीन : दिवसभरात अचानक खर्चात वाढ झाल्याने आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. तणावातून दूर राहण्यासाठी प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांकडून गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com