Chandra Grahan 2025 saam tv
राशिभविष्य

Chandra Grahan: वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरणार अशुभ; आर्थिक नुकसानीसह आरोग्यही बिघडणार

Chandra Grahan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असणार आहे. याशिवाय केतू आधीच कन्या राशीत असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट अंतराने त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळा परिणाम होताना दिसतो. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च २०२५ रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण या दिवशी सकाळी ९:२९ ते दुपारी ३:२९ पर्यंत राहणार आहे. शास्त्रानुसार,हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.

यावेळी त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. परंतु ग्रहांच्या स्थितीमुळे त्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर निश्चितच होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असणार आहे. याशिवाय केतू आधीच कन्या राशीत असणार आहे. ज्यामुळे ग्रहण होईल. या योगायोगाचा परिणाम काही राशींसाठी शुभ असणार आहे, जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना सतर्क राहावं लागणार आहे.

मिथुन रास

आयुष्यात काही समस्या उद्भवू शकणार आहेत. या काळात सुविधांचा अभाव असू शकतो. कौटुंबिक वाद आणि मानसिक ताण वाढू शकतो. चौथ्या घरात ग्रहण असल्याने, एखाद्याला तणाव आणि अस्थिरता जाणवू शकते. मोठी गुंतवणूक टाळणं गरजेचं आहे.

सिंह रास

मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकणार आहेत. करिअरमध्ये अडथळे आणि अडचणी येऊ शकतात. कोणताही मोठा निर्णय सध्या तरी पुढे ढकलणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. जीवनात नकारात्मकता कायम राहू शकते.

तूळ रास

छोट्या छोट्या कामांवर तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकणार आहे. बाराव्या घरात ग्रहण असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्यास विलंब होऊ शकतो. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज भासू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

SCROLL FOR NEXT