Lucky Zodiac Signs 
राशिभविष्य

Lucky Zodiac Signs: बुध आणि शनीच्या पूर्ण संयोगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, नव्या सुवर्ण संधी मिळतील!

Lucky Zodiac Signs: बुध आणि शनि शून्य अंशावर एकमेकांशी पूर्ण संयोग करतील. हा योग खूप खास असल्याचं मानलं जात आहे. ज्योतिषांच्या मते, बुध-शनीच्या पूर्ण संयोगाने 5 राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्रातील दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह, बुध आणि शनि, अगदी शून्य अंशावर एकमेकांशी युती करतील. याला ज्योतिषशास्त्रीय भाषेत पूर्ण संयोग म्हटलं जातं. हे दोन्ही ग्रह मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर संयोग करतील. बुध आणि शनीचा संयोग अतिशय विशेष मानला जातो, कारण या दोन ग्रहांची एकमेकांशी समान भावना आहे.

ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वांनुसार सम भव हे जवळजवळ मैत्रीच्या समतुल्य मानले जाते. कारण ते कोणत्याही परिस्थितीत अशुभतेला प्रोत्साहन देत नाही. जेव्हा हे दोन ग्रह एकाच राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्यांचा प्रभाव अधिक होत असतो.

राशींवर बुध-शनीच्या पूर्ण संयोगाचा प्रभाव

बुध हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक अतिशय शुभ ग्रह आहे, जो बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद आणि द्रुत विचारांना प्रोत्साहन देतो, तर शनिदेव हा शिस्त, संयम, कृती आणि स्थिरता यांचा कारक आहे. असेही सांगितले जाते की,या ग्रहांच्या संयोगामुळे व्यक्ती गंभीर विचारक, व्यावहारिक आणि संयमशील बनते. ज्यामुळे निर्णय घेताना सावधगिरी आणि व्यावहारिकता वाढते.

या संयोगाने पैसा कमावण्याची क्षमता वाढते, परंतु शनीच्या प्रभावामुळे ते हळूहळू आणि काही संघर्षानंतर प्राप्त होते. ज्योतिषांच्या मते, बुध आणि शनिचा 0 अंशावर असलेला हा पूर्ण संयोग सर्व राशींवर परिणाम करेल. पँण बारा राशीपैकी 5 राशीच्या लोकांना बुध आणि शनीच्या या संयोगामुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी, बुध-शनी युती करिअर, वित्त, कौटुंबिक जीवन आणि आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकते. या संयोगाचा परिणाम करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो. पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी आणि आदर मिळू शकेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी, हे संयोजन करिअर, वित्त आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती, नवीन संधी आणि मान-सन्मान वाढेल. व्यावसायिकांना भागीदारीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जुन्या संपत्ती किंवा शेअर बाजारातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. जुन्या संपत्तीचा वाद मिटेल आणि तुम्हाला लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. कौटुंबिक जीवनात बुध-शनि संयोगाचा प्रभाव अत्यंत सकारात्मक असू शकतो.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी पण या दोन ग्रहांची युती फायदेशीर ठरेल. कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे. करिअरमध्ये प्रगती आणि उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठ्या प्रकल्पात यश मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीची संधी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास फायदा होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन ग्रहांचे संयोग हे करिअर, वित्त आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास फायदेशीर आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, सरकारी नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीचा संयोग अत्यंत शुभ राहील. करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवीन योजनांमध्ये यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ, गुंतवणुकीतून नफा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT