Daily Horoscope: 'या' ५ राशींसाठी रविवारचा दिवस ठरेल भारी; नोकरी, प्रेम, व्यवसायात मिळेल यश

Zodiac Sign: काही राशींसाठी उद्याचा म्हणजेच रविवारचा दिवस खूप लकी ठरणार आहे. या दिवशी अनेक कामात यश मिळेल. रविवार पाच राशींच्या लोकांसाठी भारी ठरणार आहे.
Daily Horoscope
Zodiac Signsaam tv
Published On

ज्योतिष्यचार्य आरती पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीचा दिवस पाच राशींसाठी लकी ठरणार आहे. काही राशींच्या जातकांना रविवार नोकरीमध्ये आनंदाची बातमी देणारा, तर काहींना वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे अनेकांना यश, आर्थिक लाभ आणि आनंद मिळणार आहे. यात मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ राहील. नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. जे लोक काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यासाठी हा काळ अनुकूल राहील.

Daily Horoscope
Ketu Gochar 2025: केतू ग्रह १८ वर्षांनंतर सिंह राशीत करणार प्रवेश; ‘या’ ३ राशींना येणार 'अच्छे दिन',नोकरी अन् व्यवसायात होईल प्रगती

मेष

या राशीच्या लोकांसाठी 23 फेब्रुवारी हा दिवस अतिशय शुभ असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. ज्यामुळे मनाला शांती मिळेल. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. तर ज्या लोकांना नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

सिंह

आजचा दिवस हा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगला दिवस असणार आहे. तुमच्या आज अनेकांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. काही जातकांची पदोन्नती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो. कुटुंबात चांगली बातमी मिळेल. ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते.

Daily Horoscope
Horoscope: सावधान! अडचणी, आर्थिक संकट येणार; तर काहींना होणार मानसीक त्रास, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी कसा असेल शनिवार

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी २३ फेब्रुवारीचा दिवस आर्थिक लाभ आणि प्रगती घेऊन येणारा असेल. आज अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन कामाच्या नवी संधी देखील मिळतील. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची किंवा गुंतवणुकीची योजना आखत असाल तर आजचा दिवस अनुकूल ठरेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि नात्यात गोडवा वाढवणारा आज दिवस असेल.

Daily Horoscope
Zodiac Personality Traits: 'या' ५ राशींच्या लोकांचा नका करू नाद; शत्रुत्व घेणं पडेल महागात!

मकर

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लकी ठरणार आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. या राशीतील अनेक जातकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तुम्ही कोणत्याही नवीन योजनेवर काम करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल आणि जीवनात आनंदाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com