Mercury-Venus In Cancer Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Budh Gochar: धनत्रयोदशीला बनणार लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Budh Gochar 2024: बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून आणि शुक्रासोबत लक्ष्मी नारायण राजयोग तयार करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीचा सण आता तोंडावर आला असून ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक संयोग होणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी बुध आपली राशी बदलणार आहे. यावेळी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून आणि शुक्रासोबत लक्ष्मी नारायण राजयोग तयार करणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, काही राशींसाठी विशेष योग अत्यंत फायदेशीर ठरेल. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता आणि संपत्तीचा कारक मानला जातो. बुध आणि शुक्रामुळे तयार झालेला लक्ष्मी नारायण योग काही लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खास असणार आहे. तुम्ही व्यवसायात मोठा नफा कमवू शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या या गोचरचा आणि राजयोगाचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही लाभ मिळतील. या काळात तुमच्या आत्मविश्वासावरही परिणाम होणार आहे. या काळात तुम्ही चांगले पैसे कमवू शकणार आहात.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना या गोचरदरम्यान आर्थिक लाभासोबतच त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळणार आहे. सासरच्या मंडळींकडूनही तुम्हाला मदत मिळेल. लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात प्रगती होणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख-समृद्धीचे वातावरण राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT