Shukra Gochar 2025: 5 lucky zodiac signs to receive blessings in wealth, love, and happiness saamtv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Revati Nakshatra influence on Thursday: रेवती नक्षत्रावर बुध आणि गुरु या दोन्ही ग्रहांचा संयुक्त प्रभाव असतो. मीन राशीत येणारे हे नक्षत्र असल्याने मीन राशीच्या मूळ स्वभावात गुरुत्वाकर्षण असते. गुरुवारी रेवती नक्षत्राच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळतो.

Surabhi Jayashree Jagdish

आज ९ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असल्यामुळे धार्मिक दृष्ट्या हा दिवस विशेष मानला जातो. पौर्णिमेनंतरचा हा दुसरा दिवस असून या काळात धार्मिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक शिस्तीशी संबंधित कार्यांना विशेष महत्त्व दिलं जातं.

कशी आहे आज ग्रहांची स्थिती?

आज चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल, तर रेवती नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस असल्यामुळे ज्ञान, अध्यात्म, नियोजन आणि शुभ कार्यांसाठी विशेष अनुकूल मानला जातो. या दिवशी दानधर्म, व्रत, तसेच गुरु व वडिलधाऱ्यांचा सन्मान केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडतात, असं मानलं जातं.

ग्रहस्थिती काही राशींना अनुकूल वातावरण देत असून संवाद, आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक कार्यात यशाची शक्यता आहे. चला तर मग, पाहूया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी गुरुवारचा दिवस विशेष फलदायी ठरणार आहे.

पंचांग माहिती

  • तारीख: ९ ऑक्टोबर २०२५

  • तिथी: आश्विन कृष्ण द्वितीया

  • वार: गुरुवार

  • नक्षत्र: रेवती

  • योग: परिवर्तिनी योग

  • चंद्र राशी: वृश्चिक

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२५

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:०१

शुभ मुहूर्त व राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४५ ते १२:३२

  • गुलिक काल: सकाळी ९:०० ते १०:३०

  • राहुकाल: सकाळी १०:३० ते १२:०० या वेळेत शुभ कार्य टाळावीत

  • ब्राह्म मुहूर्त: सकाळी ४:४९ ते ५:३५

  • दुर्मुहूर्त: सकाळी १०:२० ते ११:०५ आणि रात्री १०:४५ ते ११:३०

  • वर्ज्य काल: दुपारी १:५० ते ३:३०

आजचा दिवस लाभदायक असलेल्या चार राशी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा संकेत देतो. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे जुने व्यवहार मार्गी लागणार आहे. या काळात तुम्हाला नवी संधी मिळू शकणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस करिअर आणि आर्थिक क्षेत्रात फायदेशीर आहे. नवीन प्रकल्प किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल. अधिकारी आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा लाभणार आहे.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींसाठी गुरुवारचा दिवस प्रगतीचा आहे. महत्त्वाची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला सर्वजण सहकार्य करणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

Maharashtra Tourism : रंग बदलणारा महाराष्ट्रातील अनोखा तलाव, तुम्ही कधी पाहिलात का?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

गावाबाहेरच्या विहिरीत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ; हत्या की आत्महत्या?

SCROLL FOR NEXT