Shreya Maskar
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात रहस्यमय लोणार सरोवर वसलेले आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
लोणार सरोवर सुमारे ५०,००० ते ५२,००० वर्षांपूर्वी एका उल्कापातामुळे तयार झाले असल्याचे बोले जाते.
लोणार सरोवरातील पाणी हवामान आणि सूक्ष्मजीवांच्या स्थितीनुसार रंग बदलते.
सरोवराच्या खारट पाण्यात सूक्ष्मजीव वाढतात आणि रंगद्रव्ये तयार करतात, ज्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी किंवा लालसर होतो.
लोणार सरोवर हे दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकांमध्ये निर्माण झालेले आहे.
लोणार सरोवराच्या सभोवताली अनेक प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
नोव्हेंबर 2020 मध्ये महाराष्ट्रातील लोणार सरोवराला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.