Shreya Maskar
आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हटले जाते. कारण येथे भरपूर पाऊस पडतो.
आंबोली हिल स्टेशन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे वसलेले आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
आंबोली सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे धुक्याची चादर, हिरवीगार वनराई पाहायला मिळते.
आंबोली हिल स्टेशनचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील नयनरम्य आंबोली धबधबा आहे.
निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आंबोलीतील कावळेसाड पॉईंटला भेट द्या.
आंबोली जवळील श्री हिरण्यकेशी मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
आंबोली जवळील एका टेकडीवर शिरीमहादेवगड आहे, जो भगवान शिवाला समर्पित आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर आंबोलीला नक्की भेट द्या.