Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

Maharashtra Government: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On

Summary -

  • सामाजिक न्याय विभागाने ४१० कोटी रुपयांचा निधी वळता केला

  • एससी आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना योजनेचा हप्ता मिळणार

  • सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार.

  • महिला-बालविकास विभागाला निधी वापरासाठी मंजुरी मिळाली आहे

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच हफ्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळता करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. महिला-बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलासांठी वापरण्यात यावा, अशी सूचना केली आहे.

सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळता करण्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. या निर्णयानुसार, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत ३९६० कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबर महिन्यातील पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना हप्त्याचे पैसे देण्यासाठी एक पत्र काही दिवसांपूर्वी पाठवत निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानामधील ४१०.३० कोटी रुपयांचा निधी देण्यास महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभागाने मंजुरी दिली.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार? खात्यात खटाखट ३००० रुपये येणार

सामाजिक न्याय विभागाने निधी मंजूर करताना महिला व बालविकास विभागाला महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. या सूचनेनुसार अनुसूचित जातीच्या आणइ नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घ्यावी. विभागाअंतर्गत संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हत्पा मिळणार नाही हे देखील लक्षाच घ्यावे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता
Ladki Bahin Yojana: eKYC नाही, सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकीच्या पुढच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com