Gajlaxmi Rajyog saam tv
राशिभविष्य

Gajlaxmi Rajyog: जुलै महिन्यात 'या' राशींवर असणार लक्ष्मीची कृपा; गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे मिळणार छप्परफाड पैसा

Gajlaxmi Rajyog 2025: देवांचा गुरू गुरू 14 मे रोजी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय धनदाता शुक्र 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे देवांचा गुरू बृहस्पति ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो, ज्याचा 12 राशींच्या जीवनावर होतो. गुरू वृषभ राशीत विराजमान असून मे महिन्यात तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत येऊन गुरू अनेक राशींचे नशीब उजळवू शकणार आहे.

जुलै महिन्यात गुरू शुक्राशी युती करणार आहे. 12 वर्षांनंतर या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने गजलक्ष्मी तयार होणार आहे. यामुळे अनेक राशींच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. देवांचा गुरू गुरू 14 मे रोजी रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय धनदाता शुक्र 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले क्षण येणार आहेत. तर काहींना यावेळी प्रत्येक कामात यश मिळणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

या राशीत अकराव्या भावात गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. यावेळी तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असणार आहे. तुमच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या किंवा आव्हानं आता संपुष्टात येणार आहेत. बुधाच्या कृपेने बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढणार आहे. आकस्मिक पैशांचा लाभ मिळू शकतो.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लग्नभावात बुध आणि शुक्र यांची युती होणार आहे. काही राशी प्रत्येक क्षेत्रात अफाट यश मिळवू शकतात. जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या दुसऱ्या घरात शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवणुकीत गुंतवाल. तुम्हाला खूप फायदा होऊ शक्यता आहे. सासरच्यांशी तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT