Chaturgrahi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: 2 दिवसांनी 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; मंगळाच्या राशीत बनणाऱ्या योगामुळे मिळणार पैसाच पैसा

Chaturgrahi Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा ऊर्जा, साहस, शौर्य, जमीन आणि धन यांचा कारक मानला जातो. मंगळ जेव्हा शुभ स्थितीत येतो किंवा चंद्रासारख्या शुभ ग्रहांसोबत युती करतो, तेव्हा खास योग तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात चंद्राला नवग्रहांपैकी सर्वात वेगाने गती करणारा ग्रह मानले जाते. तो एका राशीत सुमारे दोन ते अडीच दिवस राहतो. त्यामुळे चंद्राच्या स्थितीत बदल होताच इतर ग्रहांशी युती किंवा दृष्टि होते आणि त्यातून शुभ-अशुभ राजयोगांची निर्मिती होते.

नोव्हेंबर महिना काही राशींच्या जातकांसाठी विशेष ठरू शकतो, कारण या महिन्यात अनेक मोठे राजयोग तयार होणार आहे. सध्या वृश्चिक राशीत मंगळ, सूर्य आणि बुध विराजमान आहेत. त्यामुळे त्रिग्रही योगासह मंगळ-आदित्य योग, बुध-आदित्य योग आणि रुचक राजयोग तयार होणार आहेत.

येत्या 20 नोव्हेंबरला चंद्रही या राशीत प्रवेश करणार असल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. यासोबतच मंगळ-चंद्र युतीने महालक्ष्मी योग, सूर्य-चंद्र युतीने शशि-आदित्य योग आणि बुध-चंद्र युतीने विशेष योग तयार होणार आहे. याचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येऊ शकतो. मात्र, या तीन राशींच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकणार आहे.

वैदिक ज्योतिषानुसार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 4 वाजून 13 मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि सूर्य, मंगळ व बुधासोबत युती करून सामर्थ्यशाली चतुर्ग्रही योग निर्माण करेल.

वृश्चिक राशि

या राशीच्या व्यक्तींसाठी चतुर्ग्रही योग अत्यंत लाभदायी ठरू शकतो. कर्क राशीत असलेला गुरु मंगळ आणि चंद्रावर दृष्टि टाकत असल्याने या राशीच्या जातकांना भाग्याचा पूर्ण साथ मिळू शकणार आहे. गुरुच्या प्रभावामुळे दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. जीवनात आनंदाचं आगमन होणार आहे. लक्ष्मीमातेच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकणार आहेत.

तूळ रास

या काळात तुमच्या लग्नभावात शुक्र विराजमान असून मालव्य राजयोग तयार करणार आहे. दशम भावात देवगुरु बृहस्पती हंस महापुरुष राजयोग निर्माण करणार आहे. या राशीच्या दुसऱ्या भावात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना असल्यास ही वेळ अनुकूल आहे.

वृषभ राशि (Vrishabha)

या राशीच्या कुंडलीतील सातव्या भावात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. घर-परिवारासोबत आनंदी वेळ घालवता येणार आहे. घरगुती वादविवाद संपुष्टात येऊ शकणार आहेत. नोकरीमुळे काही प्रवास करावे लागू शकतात. जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक दृढ होऊ शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

After OLC: मराठी चित्रपटाला साऊथच्या अ‍ॅक्शनचा तडका; 'आफ्टर ओ.एल.सी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

सर्वात मोठी बातमी! जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार, ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

IMD Recruitment: सरकारी नोकरीची संधी, हवामान विभागात भरती; पगार मिळणार १,२३,००० रुपये; अर्ज कसा करावा?

De De Pyaar De 2 Collection : 'दे दे प्यार दे 2' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, जगभरात किती कोटींचा गल्ला जमावला?

SCROLL FOR NEXT