Samsaptak Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: 2 दिवसांनी शक्तीशाली गुरु बनवणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार अचानक धनलाभ

Samsaptak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ज्ञान, संपत्ती आणि शुभत्वाचा कारक ग्रह मानला जातो. २ दिवसांत गुरु सामसप्तक राजयोग निर्माण करणार आहे. हा योग अत्यंत शक्तिशाली असून काही राशींना अचानक आर्थिक लाभ, यश आणि प्रगती मिळण्याची संधी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून समसप्तक राजयोग आणि नवपंचम राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. २० डिसेंबर रोजी धनाचे दाता शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे शुक्र आणि गुरु एकमेकांच्या सातव्या भावात येणार आहे. अशावेळी अतिचारी देवगुरु बृहस्पति मिथुन राशीत विराजमान असतील आणि या स्थितीत गुरु–शुक्र मिथुन राशीच्या सातव्या भावात बसून समसप्तक राजयोग तयार करणार आहेत.

समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळून निघणार आहे. यावेळी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीसाठी समसप्तक राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात तुमच्या कामांमध्ये नशिबाचा साथ मिळणार आहे. गुंतवणूक किंवा लॉटरीसारख्या माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वेगळी ओळख मिळू शकणार आहे. करिअरमध्ये नवे संधी मिळतील.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ राशीसाठी समसप्तक राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ योग्य ठरणार आहे. समाजात मान–सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होण्याचे संकेत मिळतील.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीसाठी समसप्तक राजयोग शुभ फलदायी ठरू शकतो. या काळात नोकरी आणि व्यवसाय दोन्ही क्षेत्रांत प्रगती होणार आहे. जुनं कर्ज फेडण्याची संधी मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कार्यस्थळी वरिष्ठ आणि कनिष्ठांचा साथ मिळेल. नोकरी बदलण्याची किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT