Aries yearly horoscope 2026 saam tv
राशिभविष्य

Aries yearly horoscope: मेष राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार नवं वर्ष? कशी असेल आरोग्य आणि लव्ह लाईफ, पाहा

Aries yearly horoscope 2026: नवीन वर्ष २०२६ मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. ज्योतिषांच्या मते, या वर्षात आरोग्य, प्रेमजीवन आणि वैयक्तिक संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी दिसतील.

Surabhi Jayashree Jagdish

आता अवघ्या ८ दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२६ मधील ग्रहांच्या स्थितीनुसार वर्षाच्या सुरुवातीचे परिणाम दिसून येतील. वर्षाच्या सुरुवातीला सूर्य बुध, शुक्र आणि मंगळासह धनु राशीत असणार आहेत. गुरु मिथुन राशीत असणार आहे. गुरुची राशी असलेला शनि मीन राशीत असेल.

याशिवाय केतू सिंह राशीत असेल आणि राहू कुंभ राशीत असेल, ज्यामुळे वर्षाचे परिणाम दिसून येतील. मेष राशी सध्या शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहे. २०२६ हे वर्ष मेष राशीसाठी कसं असणार आहे हे पाहूयात.

आरोग्यावर कसा होणार परिणाम?

२०२६ हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी चांगलं असणार आहे. यावेळी मानसिक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात सुधारणा, लढण्याची क्षमता वाढेल आणि सामाजिक प्रतिष्ठा, प्रतिष्ठा आणि आदर वाढणार आहे. नवीन योजना फायदेशीर ठरू शकणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. मात्र किरकोळ आजार पाठ सोडणार नाहीत.

आर्थिकदृष्टया कसं असेल वर्ष?

आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून २०२६ हे वर्ष सकारात्मक बदलांचं असणार आहे. या वर्षी व्यवसाय आणि नोकरीत चांगली प्रगती होण्याची चिन्ह आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना लक्षणीय यश मिळणार आहे. बांधकाम आणि रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांनाही नवीन अनुभव मिळणार आहेत. एकंदरीत आर्थिक दृष्टिकोनातून मेष राशीच्या लोकांना या वर्षी प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील.

हे वर्ष धाडसी आणि सामाजिक दृष्टिकोनातून खूप सकारात्मक ठरणार आहे. मित्रांच्या मदतीने भागीदारीच्या कामात प्रगती होणार आहे. घर आणि गाडी सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला रिअल इस्टेटमधून फायदा होण्याची शक्यता आहे.

करियरमध्ये होणार का फायदा?

पदवी आणि करियरसाठी हे वर्ष उत्तम राहणार आहे. नवीन विषयांचा अभ्यास करण्यासाठी आणि नवीन महाविद्यालय किंवा विद्यापीठ निवडण्यासाठी हे वर्ष फायदेशीर ठरणार आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. कर्जातून मुक्त होण्यासाठी देखील हे वर्ष चांगलं राहणार आहे.

कशी राहणार लव्ह लाईफ?

तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं खूप चांगलं राहणार आहे. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य सुधार असून प्रेमसंबंध सुधारणार आहे. नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकणार आहेत. लग्नासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Corporation Elections: महापालिकेसाठी काँग्रेसने कंबर कसली, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Unnao Case : बलात्कार प्रकरणात भाजपच्या माजी आमदाराला दिलासा; हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Digestion Problems: थंडीत जेवण पचायला वेळ लागतोय? 'हे' घरगुती उपाय पोटाच्या सगळ्या समस्या करतील दूर

हिंदूंनी किमान ३-४ मुलं जन्माला घातली पाहिजेत; नवनीत राणा यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT