Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : जुने आजार बळावतील, आरोग्याची काळजी घ्या; ३ राशींच्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाण्याची शक्यता

Horoscope Today In Marathi : आज काही जणांना जुने आजार बळावतील. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तर या राशींच्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,१ एप्रिल २०२५,चैत्र शुक्लपक्ष,

विनायकी चतुर्थी(अंगारक योग)

तिथी-चतुर्थी २६|३३

रास- मेष १६|३० नं. वृषभ

नक्षत्र- भरणी

योग- विष्कंभ ०९|४८

प्रीतियोग ३०|०७

करण- वणिज

दिनविशेष- ११ प. चांगला

मेष - आज अंगारक योग आहे. विशेष पर्वणी आपल्या राशीसाठी आहे. स्वतःची प्रगती करण्यासाठी, नव्या गोष्टी आयुष्यात घडवून आणण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी वेळ आपली वाट पाहत आहे. संधी दवडू नका.

वृषभ- सुखाच्या घटना घडतील. पण या सुखासाठी आपल्याला काही द्यावे ही लागेल मग वेळा असो, पैसा असो किंवा मानसिकता थोडी दोलायमान राहू शकते. अध्यात्मिक प्रगती कराल.

मिथुन- बोलून समोरच्याला आपल्यासे करणे हे आपल्याला आवडते. मैत्रीमध्ये पुढाकार घ्याल. एकत्रितरित्या स्नेहभोजनाचे योग मिळणार आहेत. दिवस चांगला आहे.

कर्क - मानसन्मान, प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रवासामध्ये दिवस व्यस्त राहिल. आपले वरिष्ठ व्यक्तींकडून विशेष कौतुक होईल.

सिंह - सिंहासारख्याच गोष्टी घडतील. ताठ मानेने, ताठ बाण्याने जगाल. भाग्यकारक घटना आज होणार आहेत. गणेश आणि रवी उपासना विशेष फलदायी ठरेल.

कन्या- कामाचा डोंगर उपसावा लागेल. काही वेळेला मन ,बुद्धी का शरीर यामध्ये निर्णय घेता येणार नाही. पण स्वतःचा सहभाग हाच जास्त महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल. इतरांकडून कोणतेही अपेक्षा नको.

तूळ - जोडीदाराचे योग्य सहकार्य मिळेल. भागीदारासह नवीन प्रस्ताव आणि दोघांनी मिळून कामे करण्याचे योग आहेत. कोर्टाच्या कामात यश मिळेल.

वृश्चिक - गुप्तशत्रू वाढते राहतील. प्रवासामध्ये काळजी घ्या. साप विंचू यांपासून धोका संभवतो आहे. पोटाशी निगडित आजार, फूड पॉयझनिंग या गोष्टींपासून स्वतःला जपावे लागेल.

धनु - दत्त उपासना फलदायी ठरेल. शेअर्स, लॉटरी मध्ये चांगला नफा मिळेल. आपला सल्ला इतरांना रास्त वाटेल. तुमच्यामुळे इतरांची प्रगती होईल.

मकर - घरामध्ये नव्याने काही गोष्टी कराल. जेष्ठा व्यक्तींची सेवा विशेष करावी लागेल. जोडीदाराच्या करियरबद्दल सुवर्ता कानी येतील. दिवस चांगला आहे.

कुंभ- छोट्या प्रवासातून फायदा होईल. प्रवास थोडे विलंबाने दिरंगाईने आणि कंटाळवाणे होतील. पण आपल्या केलेल्या कामावर पक्के, चांगले शिक्कामोर्तब होईल.

मीन - गुंतवणूक फायद्याची ठरेल. कुठेही साक्षीदार राहताना चार वेळा विचार करा. जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायला लागेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT