Daily Horoscope Today 8th July 2024 Saam TV
राशिभविष्य

Horoscope Today : आळस झटका अन् कामाला लागा, आज 'या' राशींच्या लोकांचं पालटणार नशिब ; वाचा राशीभविष्य

Rashi Bhavishya Today 8th July 2024 : आजचे संपूर्ण राशीभविष्य आणि दैनिक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ राशीचक्रानुसार आज या राशींच्या लोकांचं पालटणार नशिब, तुमची रास यात आहे का?

Anjali Potdar

आजचे पंचांग - ८ जुलै २०२४

वार - सोमवार आषाढ शुक्लपक्ष. तिथी - तृतिया. योग - वज्र. करण - तैतिल. रास - कर्क. दिनविशेष - वृद्धितिथी

मेष : व्यवहार मनासारखे होतील

आजचा दिवस पाहुण्यांच्या सरबराई मध्ये जाईल. घरामध्ये काहीतरी नवीन बदल करायचे असल्यास त्याची आखणी होईल. जागेचे व्यवहार मनासारखे पार पडतील.

वृषभ : भावंडांचे सहकार्य लाभेल

गोड बोलून शेजाऱ्यांकडून काम करून घ्याल. भावंडांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची पत्रे आज हाती लागतील. आणि त्याच्यामधून पुढील कामाची सुरुवात होईल.

मिथुन : दिवस थोडासा धावपळीचा

दिवस थोडासा धावपळीचा. पण कागदपत्राच्या बाबतीत कोणालाही साक्षीदार राहू नका. कुटुंबीयांचा मोलाचा सल्ला विचारात घ्या.

कर्क : आनंदाचे तरंग उठतील

आपल्यामध्ये खूप छान आनंदाचे तरंग आज उठतील. "स्वतःसाठी आयुष्य जगावं" अशी भावना मनात येईल. सकारात्मकतेने भरलेला आजचा दिवस राहील.

सिंह : आज मनस्ताप टाळा

विनाकारण ताण त्रास आणि मनस्ताप याच्यामध्ये दिवस जाईल. परदेशी जाण्याच्या संधी येतील. दवाखाना मागे लागू शकतो.

कन्या : जे ठरवाल ते होईल

"जे ठरवाल ते होईल". जुन्या मित्र मैत्रिणी यांची गाठभेट होईल. थोडे प्रवासाला जाण्यासाठी आखणी कराल. लोकांमध्ये स्वतःला गुंतवून घ्याल.

तूळ : दिवस उत्तम आहे

"मी आणि माझे पण" सोडून आजचा दिवस हा फक्त व्यवसायासाठी योगदान म्हणून आलेला आहे. चांगले काय वाईट काय हे तुम्ही न मापून न तोलत काम करत राहिलात तर दिवस उत्तम आहे.

वृश्चिक : देवाची उपासना कराल

धर्म व अध्यात्म याच्या नावाखाली अवडंबर चाललेले आपल्याला आवडत नाही. सचोटीने देवाची उपासना कराल. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर" अशी तुमची भावना असते त्याच पद्धतीने,मार्गाने आध्यातमाचा प्रचार कराल.

धनु : आज सावधानतेचा इशारा

खोट्या गोष्टी मुळातच आपल्याला आवडत नाहीत. कायद्याच्या कचाट्यात राहून जे करायचं ते तुम्हाला आवडतं. पण दुसरं कोणी यात गुंतवत असेल तर त्यासाठी आज सावधानतेचा इशारा आहे.आपल्या विक्षिप्त वागण्याने इतरांना त्रास होणार नाही ना. याची काळजी घ्या.

मकर : आळस सोडून द्या

कष्ट व मेहनत याच्या जोरावर अनेक गोष्टी पादाक्रांत करता येतात हे आपल्याकडून शिकावे. म्हणून आळस सोडून आज नवीन काम आणि येणाऱ्या संधी यांचे स्वागत करा. कोटकचेरीचा निकाल मनाप्रमाणे लागेल.

कुंभ : प्रेमाचे उमाळे येतील

आजोळी, मामाशी सख्य वाढेल. काही जणांना उगाचच आपल्याविषयी आज प्रेमाचे उमाळे येतील. पण मित्र आहेत का शत्रू याची चांगली पारख करूनच अशा लोकांजवळ जा. सावध रहा असा आज इशारा आहे.

मीन : चांगल्या गोष्टीत गुंतवून घ्याल

"देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा" अशी आज भावना असेल. स्वतःला चांगल्या गोष्टीत गुंतवून घ्याल. काही वेळेला आपल्याला आवडतं तेच देवपण असेही मानून घेणाऱ्या गोष्टीचे स्वागत करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

Palash Muchhal Net Worth : स्मृती मानधाना की पलाश मुच्छल कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत?

SCROLL FOR NEXT