Horoscope Today : प्रगतीचे द्वार खुलतील, हाती येईल बक्कळ पैसा; या राशींच्या लोकांचं आज खुलणार भाग्य

Rashi Bhavishya Today 7th July 2024 : आजचे पंचांग आणि संपूर्ण राशीभविष्य, रविवार दिनांक ७ जुलै २०२४ राशीचक्रानुसार तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या
आजचे संपूर्ण राशी भविष्य
Rashi Bhavishya Today 7th July 2024Saam TV

आजचे पंचांग - दिनांक ७ जुलै २०२४

वार - रविवार आषाढ शुक्लपक्ष. तिथी - द्वितीया. नक्षत्र - पुष्य. योग - हर्षण. करण-बालव. रास - कर्क. दिनविशेष-उत्तम दिवस

मेष : कुटुंबीयांचे प्रेम मिळेल

घर, जागा, गाडी घेण्याचा विचार असेल तर आज त्याविषयी पावले उचलायला हरकत नाहीत. नवीन व्यवहार कराल. कुटुंबीयांचे प्रेम मिळेल. पण यासाठी अनेक गोष्टी आपल्याला आधी पेरणी करायला लागतील.

वृषभ : दिवस समृद्ध राहणार

लेखनकला बहरेल. पत्रव्यवहार मार्गी लागतील. नवीन गोष्टी सुचतील आणि त्यातून प्रसिद्धी मिळेल. वाणी आणि वाचा यामुळे आजचा दिवस समृद्ध राहणार आहे.

मिथुन : आपला चांगला राहील

काही नवीन वस्तू खरेदी, अलंकार खरेदी, वस्त्र खरेदी यासाठी आजचा दिवस आपला चांगला राहील. आपले म्हणणे इतरांना मान्य होईल. अर्थात त्यासाठी त्यांना सांभाळून घ्यावे लागेल.

कर्क : सकारात्मकता वाढेल

"ऋतू हिरवा, ऋतू बरवा" असा आजचा दिवस हलका आणि आनंदी आहे. सहज साधे आयुष्य जगायला आपल्याला आवडते. अशा संधी घेऊन आजचा दिवस आलेला आहे. सकारात्मकता वाढेल.

सिंह : अनाठही खर्च होईल

पैशाचा विनियोग याचे तारतम्य आज बाळगाच. अनाठही खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनस्तापही होईल. पैशाचा खर्च होणे यापेक्षा त्याचा हिशोब न लागणे हे दुःख जास्त असते. अशाच विचारात आजचा दिवस जाईल.

कन्या : स्नेहभोजनाचे योग येतील

आयुष्य जगणं काय हे आपल्याकडून शिकावं. अशाच गोष्टी इतरांना आनंद देत आज आपण करणार आहात. स्नेहभोजनाचे योग येतील. शेजारी सौहार्दाने वागाल. सुना जावयांसोबत दिवस आनंदी जाईल

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

तूळ : विशेष सन्मान मिळतील

कामाचं स्वरूप थोडे अवघडच राहील. पण त्यातून नक्कीच आज मार्ग काढाल. मंगळाचे धाडस काम करेल. यातूनच विशेष सन्मान मिळतील. धावपळीचा दिवस राहणार आहे.

वृश्चिक - भाग्याचा दिवस आहे

आयुष्यात साधेपणा हा खूप महत्त्वाचा आहे. तो तुमच्याकडे आहे. देवधर्माबरोबर तुम्ही इतरांना आदर दिल्यामुळे लोक तुमची कदर करतात. त्यामुळे भाग्य घेऊन आलेला दिवस आहे तो अध्यात्माकडे मार्गी लावा.

धनु : दिवस कटकटी जाईल

"कोणी निंदा व कोणी वंदा आपल्याच धुंदीत राहणे हाच आमचा धंदा. असा तुमचा दिवस आजचा आहे. त्रास कटकटी जरी असल्या तरी "चोरावर मोर होऊन" दिवस व्यतीत कराल.

मकर : प्रगतीची द्वार खुले होतील

नुसते शांततेने जग काबूत आणता येत नसतं. काही वेळेला आपण केलेले विचार हे लोकांपुढे योग्य रीतीने मांडावे लागतात. आज अशाच गोष्टी तुम्हाला व्यवसायात कराव्या लागतील. त्यामुळे प्रगतीची द्वार खुले होतील.

कुंभ : दिवस त्रासाचाच जाईल

तब्येत, रोग, आजार, कटकटी, दुःख, दैन्य, दारिद्र्य यांनी भरलेला आजचा दिवस आहे. जरा त्रासाचाच जाईल. पण यावर तुम्ही नियंत्रण आणू शकता. दत्त उपासना करा. तुम्हाला आज फायद्याचे ठरेल.

मीन : विशेष उपासना करा

"कोणी असो वा नसो" आपला मार्ग हा आपल्याला आखावाच लागणार आहे. ते सुद्धा आत्मविश्वासाने. विशेष उपासना करा दिवस चांगला जाईल. काही आयुष्यातील गाठी सैल केलेल्याच बरे असतात.

आजचे संपूर्ण राशी भविष्य
Horoscope Today : आज या राशींच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा; नशिबाची मिळणार उत्तम साथ, वाचा राशीभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com