Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : व्हॅलेंटाईन डेला ५ राशींवर होणार पैशांचा वर्षाव; तुमच्या नशिबात काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर!

horoscope today saturday, 14 February 2026 : आजचे सविस्तर राशिभविष्य जाणून घ्या. प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती आणि आरोग्याबाबत १२ राशींसाठी खास ज्योतिषीय अंदाज वाचा.

Namdeo Kumbhar

मेष (Aries):

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा अन् समृद्धीचा राहील. कला, लेखन किंवा कोणत्याही सर्जनशील (Creative) क्षेत्रातील लोकांना मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, पण घाईत निर्णय घेऊ नका.

वृषभ (Taurus):

वृषभ राशींच्या लोकांनी आज बोलताना संयम ठेवा, अन्यथा जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. सुख-सुविधांवर खर्च होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग येऊ शकतात.

मिथुन (Gemini):

मिथुन राशिंच्या लोकांचा आज आत्मविश्वास दांडगा असेल. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील. व्यवसायात काही नवीन योजना यशस्वी होतील. प्रवासाचे योग आहेत.

कर्क (Cancer) :

आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गुंतवणूक करताना सावध राहा. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. खानपानाकडे लक्ष द्या, पोटाचे विकार जाणवू शकतात.

सिंह (Leo):

सिंह राशींच्या लोकांची आज सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस (व्हॅलेंटाईन डे) खास असेल. जोडीदारासोबतचे जुने वाद मिटून नाते घट्ट होईल.

कन्या (Virgo):

कन्या राशींच्या लोकांना आज कामाचा ताण थोडा जास्त राहू शकतो. धावपळ झाल्यामुळे थकवा जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने बजेट सांभाळा. पैसे उधार देणे आज टाळावे.

तूळ (Libra):

वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आनंदाची बातमी समजू शकते.

वृश्चिक (Scorpio) :

नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप मोलाचे ठरेल.

धनु (Sagittarius) :

भाग्याची साथ लाभल्यामुळे कठीण कामेही सोपी होतील. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. प्रवासाची इच्छा असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा दिवस आहे.

मकर (Capricorn):

मकर राशींच्या लोकांना आज थोडे सावध राहणे गरजेचे आहे. कामात अचानक अडथळे येऊ शकतात. मात्र, अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.

कुंभ (Aquarius):

तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करेल. व्यापारात भागीदारीतून मोठा लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. अविवाहितांचे विवाह जमण्याचा आज योग आहे.

मीन (Pisces):

जुना आजार बरा होण्यास मदत होईल. शत्रू किंवा विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT