शनिवार,२३ ऑगस्ट२०२५,श्रावण कृष्णपक्ष.
तिथी-अमावस्या ११|३७
रास-सिंह
नक्षत्र-मघा
योग-परीघ
करण-नागकरण
दिनविशेष- अमावस्या वर्ज्य
प्रेमामध्ये विशेष रंग भरले जाणार आहेत. कदाचित गोडी गुलाबीने सगळे चालू आहे असे वाटतानाच आपल्याकडून एखादी चूक होण्याची शक्यता आहे. आपल्या राशी स्वभावाप्रमाणे विचार करता आज डोके शांत ठेवून निर्णय घ्यावेत. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल.
रात्रीच्या अंधारामध्ये नव्याने पहाट होत असते. आपल्या राशीला आजचा दिवस विशेष सुखाचा जाणार आहे. जुने काही मळभ आज गळून पडेल. आजचा दिवस सुदिन आहे असे म्हणावे लागेल. सर्व सुखे मिळतील.
जुने संबंध अधिक दृढ होतील. शेजारील व्यक्तींचे विशेष सहकार्य लाभेल. आपल्या अंगातील कला गुण आज अधिकतेने बहरण्याचा दिवस आहे. अवघड गोष्टी सुलभ आणि सोप्या होताना आज कळून येईल.
पैसा कोणाला नको असतो आणि असलेला पैसा वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. आज तुम्ही केलेल्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार आहे. गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.
मुळातच आत्मविश्वासाने भरलेली आपली रास आहे. आज काही गोष्टी खूप सहज घडणार आहेत. इतरांवर आपला प्रभाव राहील. सकारात्मकतेने आणि वेगळ्या धिटाईने आपण आज वावराल.
नको असताना काही गोष्टी अंगलट येतील. पैशाला पैसा म्हणण्यापेक्षा खर्चाला धरबंद राहणार नाही. सोप्या गोष्टी विनाकारण अडचणीच्या आणि अवघड होऊन बसतील. मानसिकता नियंत्रित ठेवा.
परदेशी वार्तालाप,नवनवीन प्रदर्शन, परदेशातील भाषांमधून विशेष प्रगतीचे आणि लाभाचे आज योग आहेत. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
आपल्या कार्याला सलाम असा काहीसा दिवस आहे. इतरांकडून तुमच्या विषयी कौतुक होईल. केलेल्या धडपडीचे सुयोग्य फळ आज मिळणार आहे. राजकारणात समाजकारणात विशेष प्रगती होईल.
दत्तगुरूंची उपासना फायदेशीर ठरणार आहे. प्रेमामध्ये यश मिळेल. आपण सुरू केलेल्या आजचे काम जणू सुवर्ण पायरी असा काहीसा दिवस आहे.
खडतर परिश्रमाशिवाय पर्याय नाही हे आज जाणवेल. अडथळ्यांची शर्यत पार करून यश मिळवावे लागेल. महत्त्वाचे कामे आणि निर्णय शक्यतो पुढे ढकलणे फायद्याचे राहील.
जोडीदाराबरोबर महत्त्वाच्या गोष्टींवर बैठका होतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. व्यावसायिक भागीदार नव्याने कामाच्या वृद्धीची समीकरणे सोडवेल.
नोकरदारांसाठी दिवस चांगला आहे. अडथळे आले तरी कामे पार पडतील. आजोळी प्रेम वाढेल. मामाकडून विशेष फायदा आज संभवतो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.