Guru Nakshatra Gochar Saam Tv
राशिभविष्य

Guru Nakshatra Gochar: 2025 पर्यंत या 3 राशींवर राहणार गुरुची कृपा, 10 महिन्यांत सर्व अडचणी होणार दूर

Rashi Bhavishya in Marathi: देवगुरू सध्या रोहिणी नक्षत्रात आहे आणि सुमारे 12 वर्षानंतर गुरूने मे 2024 मध्ये वृषभ राशीत प्रवेश केला. देवगुरु गुरू 13 मे 2025 पर्यंत या राशीत राहणार आहेत. यामुळे काही राशींना खूपच लाभ मिळणार आहे. या कोणत्या राशी आहेत? हे जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह आणि नक्षत्र ठराविक वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतात. ज्याप्रमाणे ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर दिसून येतो. देवगुरू सध्या रोहिणी नक्षत्रात आहे आणि सुमारे 12 वर्षानंतर गुरूने मे 2024 मध्ये वृषभ राशीत प्रवेश केला. देवगुरु गुरू 13 मे 2025 पर्यंत या राशीत राहणार आहेत.

शुक्र हा वृषभ आणि रोहिणी नक्षत्राचा स्वामी आहे. अशातच गुरु शुक्राच्या नक्षत्रात भ्रमण करत आहे. गुरुच्या या स्थितीमुळे 3 राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. या काळात या राशीच्या लोकांचे भाग्य बदलू शकते आणि त्यांना अनेक गोष्टीत फायदा मिळू शकतो.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुचे रोहिणी नक्षत्रात जाणे शुभ ठरेल. कारण या राशीत गुरु ग्रह स्थित आहे. संपत्ती, समृद्धी इत्यादी मिळविण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील. मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

सिंह

सिंह राशीच्या कर्म घरामध्ये गुरु स्थित आहे आणि त्यामुळे हा बदल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील.

धनु

धनु राशीचा शासक ग्रह गुरु आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या काळात तुम्हाला न्यायालयात विजय मिळू शकतो. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला असणार आहे.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT