Horoscope Today : आजचे राशीभविष्य, या राशींच्या व्यक्तींनी आज सतर्कता बाळगा; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Rashi Bhavishya Today : आजचे राशीभविष्य आणि पंचांग २५ जुलै २०२४ वार - गुरुवार, या राशींच्या व्यक्तींनी आज सतर्कता बाळगा; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
आजचे राशी भविष्य
Horoscope Today 25th July 2024Saam TV
Published On

आजचे पंचांग २५ जुलै २०२४

वार - गुरुवार. आषाढ कृष्णपक्ष. तिथी-पंचमी. नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा. योग - अतिगंड. करण - कौलव. रास - कुंभ - १०: ४५ प. नंतर मीन. दिनविशेष-चांगला दिवस.

मेष : फलित मिळण्याचा दिवस

मित्र व मैत्रीसाठी आपण तसेही सचोटीचे आणि खात्रीचे आहात. आज अशाच जुन्या मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल. इतरांचे तुम्ही केलेले आहे त्याचे फलित मिळण्याचा आजचा दिवस आहे. स्नेहभजनाचे योग येतील.

वृषभ : गाडा ओढावा लागेल

"कामाचा गाडा बैलासारखा ओढावा लागेल". येणाऱ्या गोष्टीचं मनाने स्वागत करा. सहकार्यांना बरोबर घेऊन चला. राजकीय क्षेत्रात आपले मत आणि सल्ला दोन्ही विचारात घेतले जाईल.

मिथुन : गोष्टी आवडीने कराल

आवडीने सगळ्या गोष्टी कराल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपली उंची वाढेल. भाग्य फळफळणे म्हणजे काय? आज याची प्रचिती येईल. दिवस चांगला जाईल.

कर्क : नाही म्हणण्याची सवय ठेवा

कधीकधी अति साधेपणा त्रासदायक ठरू शकतो. आपल्या शांत स्वभावामुळे वाईट गोष्टींमध्ये ही आपल्याला अनेकदा अडकवले जाते. स्पष्ट बोलण्याची सवय ठेवा आणि नाही म्हणण्याची सवय ठेवा. अन्यथा आज विनाकारण आळ येऊन खराब गोष्टी मध्ये अडकण्याची शक्यता आहे.

सिंह : आज निर्णय घ्यावा लागेल

कुठे हात सढळ ठेवायचा आणि कुठे आखडता घ्यायचा याचा आज निर्णय घ्यावा लागेल. आपल्या उदार स्वभावामुळे इतरांना खूप सहज गोष्टी दिल्या जातात. पण ते आपल्या त्रासदायक होत असेल तर वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. स्वतःला ओळखा आणि पुढे जा.

कन्या : बौद्धिक गोष्टीत रस वाढेल

बौद्धिक गोष्टीमध्ये रस वाढेल. नवीन कामे करताना अडचणी या ठरलेल्या असतात. त्याला फाटा देऊन नव्याने मार्ग शोधा. सहकाऱ्यांकडून आणि हाताखालील लोकांकडून विशेष मदत होईल अशी अपेक्षा ठेवू नका. दिवस अडचणींचा राहील पण त्यावर तुटून पडा.

आजचे राशी भविष्य
Kumbh Rashi Career : कुंभ राशीचे व्यक्ती असतात अत्यंत बुद्धीमान; नोकरी-व्यवसायात मिळवतात यश, जाणून घ्या राशीबद्दल

तुळ : गुंतवणूक फायदेशीर ठरेल

कला, मनोरंजन क्षेत्रात आज प्रगतीचे योग आहेत. नव नवीन गोष्टी, नवीन संकल्पना मनात येतील आणि त्याचे योग्य ते श्रेय मिळेल. काम मार्गी लागेल. संतती सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृश्चिक : इतरांना बरोबर घेऊन चला

पशुधनाला विशेष महत्त्व द्या. काही ज्या गोष्टी मनाच्या तळात आणि कोपऱ्यात दडलेल्या आहेत त्यावर विशेष विचार करा आणि त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. दिवस इतरांना बरोबर घेऊन जाण्याचा आहेत. स्वतःला जास्त महत्त्व देऊ नका.

धनु : अनेक कामे मार्गी लागतील

भावंडांच्या सहकार्याने अनेक कामे मार्गी लागतील. जागेचे व्यवहार होतील. त्यातून फायदा होईल. शस्त्र -अस्त्र दोन्ही वापरून मार्गक्रमण कराल. पत्रव्यवहार होतील.

मकर : खाण्यापिण्याची चैन राहील

आपली कागदपत्रे जपा. कोणालाही साक्षीदार राहू नका. आपण ठरवल्याप्रमाणे कामाचे नियोजन योग्य ठरेल. टप्प्याटप्प्याने काम करा. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. खाण्यापिण्याची चैन राहील.

कुंभ : फरक ओळखून पुढे जाल

स्वतःचे अस्तित्व काय आहे हे आज जाणवेल. कधीतरी त्यालाही महत्त्व देऊन बघा. दिवस चांगला राहील. योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखून पुढे जाल. इतरांना तुमच्यापासून सकारात्मकता मिळेल.

मीन : विनाकारण खर्च करणे टाळा

कष्टाने आणि मेहनतीने मिळवलेले पैसे असे सहज सोडण्यासाठी नसतात. सढळ हाताने विनाकारण पैसा आज खर्च करू नका. त्यावर अंकुश ठेवा. पुढील काळातील नियोजन आज करा. त्रास वाढतील. पण मनस्थिती ठीक ठेवा.

आजचे राशी भविष्य
Meen Rashi Bhavishya : मीन राशीचे व्यक्ती असतात खूपच रोमँटिक; नेमका कसा असतो त्यांचा स्वभाव? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com