Samsaptak Yog Rashifal saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog : गुरु-शुक्राने तयार केला समसप्तक राजयोग; आजपासून 'या' राशींच्या व्यक्ती करणार डबल कमाई

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहे. यावेळी २ ग्रह एकाच राशीत आले किंवा समोरासमोर आल्यास राजयोग तयार होतो. आज सकाळी असाच एक राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग काही राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे.

ज्योतिषीय शास्त्राप्रमाणे, धन, समृद्धी, आकर्षण यांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाणे आज सकाळी 5.49 वाजता तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे या राशीमध्ये आधीच गुरु स्थित आहे. ज्यावेळी गुरु आणि शुक्र एकमेकांपासून सप्तम स्थानावर असतात तेव्हा समसप्तक योग तयार होतो. यामुळे 13 ऑक्टोबरला म्हणजेच आज हा दुर्मिळ योग 3 राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशींमुळे कोणाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहे, ते पाहूयात.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग खूप फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होणार आहेत. या काळात पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीचा आनंदही मिळू शकतो. बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ शकते. या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग चांगला सिद्ध होणार आहे. या काळात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही चांगली बातमी ऐकायला मिळू शकणार आहे. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी अध्यात्मिक कामात तुम्ही अधिक रस घ्याल.कामाच्या ठिकाणी नोकरदार लोकांचा प्रभाव वाढू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Vacation: दिवाळीची मोठी सुट्टी 'अशी' करा प्लान, 'हे' आहे बजेट फ्रेंडली डेस्टिनेशन

Baba Siddique Death : मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी काय सांगितलं?

Marriage: आत्या-मामा ऐकलं का! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त १८ च आहेत शुभ मुहूर्त; कधी सुरू होणार लग्नसराईचा धूमधडाका

Marathi News Live Updates: पुण्यात ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर फ्लेक्सवरून टीका

Assembly Election: महायुतीत वाद? आमचं काम रोजचं त्यांचं काम निवडणुकांपुरत, आमदार सुहास कांदेंवर छगन भुजबळांची टीका

SCROLL FOR NEXT