Budh Uday 2024: धनत्रयोदशीपूर्वी बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींना होईल सुवर्णलाभ, येईल दुप्पट वेगाने पैसा

Budh Uday 2024: सध्या बुध अस्त अवस्थेत आहे. येत्या 22 तारखेला तूळ राशीत बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा राशींवर कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते पाहूयात.
budh uday oct
budh uday octsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह राशी परिवर्तनाप्रमाणे उदय आणि अस्त देखील होतात. ग्रहांचा राजकुमार बुध, ठराविक कालावधीनंतर राशी बदलतो. सध्या बुध अस्त अवस्थेत आहे. येत्या 22 तारखेला तूळ राशीत बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या दिवशी 06:58 वाजता बुध ग्रहाचा उदय होणार आहे.

बुध ग्रहाच्या प्रत्येक हालचालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. २२ ऑक्टोबर रोजी होणार्‍या बुध ग्रहाच्या उदयाचा राशींवर कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे ते पाहूयात. यावेळी काही राशींना भरपूर पैसे मिळणार आहेत, तर काही राशींना या काळात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

budh uday oct
Budhaditya Rajyog: 17 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ; बुधादित्य राजयोग करणार श्रीमंत

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे. करिअर क्षेत्रात उच्च प्रगतीसह नोकरीच्या संधी मिळू शकतात. यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक पैसे मिळणार असून आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं सहकार्य मिळणार आहे.

तूळ रास

या राशीच्या चढत्या घरात बुधाचा उदय होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. यापूर्वी केलेली तुमची गुंतवणूक चांगला परतावा देणार आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे.

budh uday oct
Laxmi Narayan Yog: बुध-शुक्राने बनवला लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com