Mangal Gochar saam tv
राशिभविष्य

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Mars in Scorpio 2025 effects: ग्रह-ताऱ्यांमध्ये होणारे बदल मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ ग्रह १२ महिन्यांनंतर स्वतःच्या मालकीच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यावर्षी अनेक ग्रहांनी त्यांच्या राशीत बदल केला आहे. २०२५ मध्ये मंगळ ग्रहाचा गोचर त्याच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं गोचर अत्यंत प्रभावशाली मानण्यात येतं. त्यातही मंगळाचा गोचर विशेष महत्त्वाचं असतं. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. ज्यावेळी मंगळ स्वतःच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा रुचक राजयोग तयार होतो.

मंगळाचं हा गोचर केवळ वैयक्तिक जीवनावरच नव्हे तर देश आणि जगभरातील घडामोडींवरही परिणाम करणारा ठरतं. काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. यावेळी कोणत्या राशींना मंगळाच्या गोचराचा विशेष लाभ मिळू शकतो ते पाहूयात.

मिथुन रास

मंगळाचा वृश्चिक राशीत गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ फल देणारा ठरणार आहे. आत्मविश्वास आणि कार्यक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरला नवीन दिशा मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीतही दिलासा मिळेल.

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींना हा काळ सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात प्रवासातूनही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ परिवर्तन आणि प्रगती घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. निवेश किंवा मालमत्तेमधून लाभ मिळू शकतो. हा काळ करिअरला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. जीवनसाथी किंवा कुटुंबाच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi Son Engagement:७ वर्षांचं रिलेशनशिप, आता साखरपुडा, प्रियांका गांधींच्या सुनबाई आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : खासदार श्रीरंग बारणे

VIDEO : तिकीट कापलं, राडा घातला, संतापानं बीपी वाढला; कुणी पेट्रोल आणलं...संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक

Ajwain Leaf Pakoda: ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी कशी बनवायची?

Nagpur: नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले, उमेदवारी न मिळाल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांचा राडा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT