Goddess Lakshmi's favorite zodiac signs saam tv
राशिभविष्य

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Goddess Lakshmi's favorite zodiac signs: दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही, तर हा धन आणि समृद्धीची देवी आई लक्ष्मीच्या पूजनाचा सर्वात मोठा काळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या आसपास ग्रहांची अशी स्थिती तयार होते की, काही राशींच्या लोकांना थेट आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या वर्षीची दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. दिवाळीच्या रात्री घराघरांत महालक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धन, समृद्धी आणि सौख्याची देवता मानण्यात येतं. त्याचप्रमाणे दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजन केल्याने घरात भाग्य उजळतं त्याचप्रमाणे पैशांचाही वर्षाव होतो अशी मान्यता आहे.

ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, माता लक्ष्मी काही विशिष्ट राशींवर विशेष कृपा ठेवणार आहे. या राशींच्या लोकांना जीवनात आर्थिक स्थैर्य, यश आणि समृद्धी सहज मिळू शकणार आहे. यामध्ये काही राशींना याचा फायदा मिळणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास (Taurus)

वृषभ ही पृथ्वी तत्वाशी संबंधित रास आहे. या राशीचे लोक धैर्यवान, मेहनती आणि स्थिर विचारांचे असतात. मेहनती स्वभावामुळे या राशीचे लोक जीवनात मोठी प्रगती करतात आणि आर्थिकदृष्ट्या बळकट होतात. या काळात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.

कन्या रास (Virgo)

कन्या ही राशिचक्रातील सहावी रास असून ती देखील पृथ्वी तत्वाशी जोडलेली आहे. या राशीचे लोक मेहनती आणि टीमवर्कवर विश्वास ठेवणारे असतात. माता लक्ष्मी या गुणांना खूप मान देतात. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना धनाची कमतरता क्वचितच भासते. त्यांच्या मेहनतीला नेहमी योग्य फळ मिळतं.

तूळ रास (Libra)

तूळ ही राशिचक्रातील सातवी रास असून ती वायू तत्वाची रास आहे. या राशीचे स्वामी देखील शुक्र ग्रह आहेत. या राशींचा संतुलित विचार करण्याची क्षमता आणि सौंदर्याची जाण लक्ष्मीमातेला आवडते. त्यामुळे माता लक्ष्मी या राशीच्या जातकांवर नेहमी कृपादृष्टी असते.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ ही राशिचक्रातील अकरावी रास असून ती वायू तत्वाशी संबंधित आहे. या राशीचे लोक आत्मनिर्भर, मेहनती, सामाजिक जाण असलेले आणि विचारशील असतात. हे लोक नवीन कल्पना मांडतात आणि समाजासाठी कार्य करतात. अशा सकारात्मक आणि प्रगतीशील वृत्तीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होते.

मीन रास (Pisces)

मीन ही जल तत्वाची रास आहे आणि तिचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. बृहस्पती हा धन आणि ज्ञानाचा कारक ग्रह आहे. मीन राशीचे लोक दयाळू, करुणामय आणि कलात्मक असतात. सौम्य आणि आध्यात्मिक स्वभाव लक्ष्मीमातेला विशेष प्रिय असतो. माता लक्ष्मी या राशीच्या लोकांवर सदैव प्रसन्न राहतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT