Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलत राहते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. येणारा आठवडा हा आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमातील चंद्र-केतू युती संततीबाबत चिंता दर्शविते. शेअर मार्केटपासून दूर राहणे योग्य राहील. उत्तरार्धात नोकरीत मोठा बदल संभवतो.

वृषभ

नोकरीत बदली संभवते. घरापासून दूर जावे लागेल. उत्तरार्धात मुलांशी मतभेद संभवतात. विद्यार्थ्यांना सप्ताह कटकटीचा राहील. मित्र-मैत्रिणींशी वादविवाद होतील.

मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला आयोजित प्रवास सहली होतील. भावंडे-नातेवाइकांशी दुरावा वाढेल. महत्त्वाची कामे अर्धवट होतील. मानसिक स्थिती खराब राहील. मुलांकडून सहकार्य मिळेल.

कर्क

स्पष्ट बोलणे टाळावे. पैशाची कामे अर्धवट होतील. मोठे खर्च करावे लागतील. उत्तरार्धात मोठे धाडसी निर्णय घ्याल. कर्तृत्वाची संधी मिळेल. विरोधकांवर विजय मिळेल. परदेशगमन, दूरचे प्रवास होतील.

सिंह

जोडीदाराशी गैरसमज संभवतात. कुटुंबात मोठे कलह संभवतात. बोलताना काळजी घ्यावी. जवळच्या व्यक्ती दुखावल्या जातील. मोठे खर्च उद्भवतील. आर्थिक ओढाताण जाणवेल.

कन्या

कर्जाची कामे अर्धवट होतील. मुलांसाठी खर्च करावे लागतील. मानसिक स्थिती खराब राहील. चिडचिड होईल. वादविवाद टाळावेत. उत्तरार्धात पैशाची कामे होतील. नोकरीत मनासारखे बदल होतील.

तूळ

इच्छापूर्तीमध्ये अडथळे येतील. अचानक मोठे खर्च उ‌द्भवतील. कर्ज मिळविण्यात अडचणी येतील. वादविवाद, कोर्टकचेरीमध्ये नुकसान संभवते. प्रवासात काळजी घ्यावी. चोरांपासून सावध राहावे.

वृश्चिक

राजकीय, सामाजिक क्षेत्रात निवृत्तीचा विचार होईल. व्यवसायात बदल होतील. घरापासून दूर बदली होण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात मोठे धाडसी निर्णय होतील. कोर्टकचेरी, वादविवादात सरशी होईल.

धनू

धार्मिक विधी, तीर्थयात्रा होतील. मात्र महत्त्वाच्या कार्यात अडथळे येतील. संत, महात्मे, गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. उत्तरार्धात वरिष्ठांशी मतभेद संभवतात. नोकरी, व्यवसायात अधिकार वाढेल.

मकर

प्रवास जपून करावेत. वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील. उत्तरार्धात बदनामीपासून सावध राहावे. विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश मिळण्यात अडचणी येतील. तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल.

कुंभ

सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी दुरावा संभवतो. कोर्टकचेरीचे निर्णय लागतील. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. अपघात संभवतात. वारसा हक्कावरून कुटुंबात वादविवाद संभवतात. मोठे खर्च झाल्यामुळे बचत कमी होईल.

मीन

बदली संभवते. हितशत्रूवर विजय मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी मोठे मतभेद संभवतात. भागीदारीच्या व्यवसायात कटकटी संभवतात. उत्तरार्धात कमी श्रमातून मोठे लाभ होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

ठाकरेंचा भाजपाला धक्का; रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत महिला नेत्यानं हाती घेतली मशाल

SCROLL FOR NEXT